पुण्यामध्ये गुरुवारी ‘या’ ठिकाणी पाणीपुरवठा बंद असणार

एम पी सी न्यूज: पुण्यामध्ये गुरुवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी वारजे जलकेंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पुणे मनपाकडून कळविण्यात आले आहे.

वारजे जलकेंद्र व अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, वारजे परिसर एसएनडीटी एच एल आर व एम एल आर टाकी परिसर स्वारगेट पाणीपुरवठा विभाग अखत्यारीतील पार्वती एच एल आर टाकी परिसर तसेच नवीन व जुने होळकर जलकेंद्र चतु:शृंगी टाकी परिसर येथील विद्युत /पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्ती व अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचे कामांसाठी नियोजन करण्यात आले आहे.

Red Zone Nigdi : रेड झोन बाधित क्षेत्रातील लोकांचा संभ्रम जिल्हाधिकाऱ्यांनी दूर करावा – सतिष मरळ

वारजे जलकेंद्रासाठी महावितरणकडून आलेल्या वीजपुरवठयासंदर्भात ब्रेकरची कामे करायची असल्याने संपूर्ण जलकेंद्र बंद राहणार आहे. त्यासाठी क्लोजरची आवश्यकता आहे. या अनुषंगाने या कालावधीमध्ये मनपाची विविध पंपिंग यंत्रणा बंद ठेवावी लागणार आहे. पर्यायाने पाणी पुरवठा बंद राहील.

यादरम्यान खालील परिसरातील पाणी पुरवठा बंद असणार आहे.

  • वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर
  • वारजे जलकेंद्र अखत्यारीतील गांधी भवन टाकी परिसर
  • वारजे जलकेंद्र अखत्यारीतील पॅन कार्ड क्लब GSR टाकी परिसर

तसेच शुक्रवार 7 ऑक्टोबर रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.