Pune Water Supply : पुण्यात गुरुवारी ‘या’ भागात राहणार पाणी पुरवठा बंद

एमपीसी न्यूज – वारजे जलकेंद्राच्या अखत्यारीतील परिसरात दुरुस्तीचे काम असल्याने येत्या गुरुवारी (दि.1) या भागांना पाणीपुरवठा (Pune Water Supply) बंद राहणार असून शुक्रवारी (दि.2) कमी दाबाने पाणी येईल अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

वारजे जलकेंद्र व अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, वारजे GSR टाकी परिसर, एस.एन.डी.टी. एच. एल.आर टाकी परीसर तसेच नवीन, जुने वारजे जलकेंद्र,गणपती माथा पंपींग, कोंढवे धावडे जलकेंद्र व जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत/ पंपींग व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे.

Pune News: उदयनराजे हतबल होऊच शकत नाहीत, त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोचल्या – देवेंद्र फडणवीस

त्यामुळे गुरुवारी पुढील भागातील पाणी पुरवठा बंद असणारा आहे-
1)वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर:- पाषाण साठवण टाकी,भुगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीन गर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वर वाडी, सुतारवाडी, निम्हण मळा, लमाणतांडा, मोहन नगर, सुस रोड, इत्यादी.
2)वारजे जलकेंद्र अखत्यारीतील गांधी भवन टाकी परिसर :- कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, पाप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी. एस. यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलकनंदा,शिवप्रभा मंत्री पार्क-१, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मी नगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज आर्चिड लेन ७ व ९. मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू. शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी,श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.
3)वारजे जलकेंद्र अखत्यारीतील पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर :- बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉइंट रोड,विजयनगर, आंबेडकर नगर, दत्त नगर, इ.
4)वारजे जलकेंद्र अखत्यारीतील GSR टाकी परिसर :- कर्वे नगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र.१ ते १०
5)एस.एन.डी.टी. (एच.एल. आर.) :- गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी,कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर,डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जय भवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी,गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड,जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमान नगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी.
6)कोंढवे धावडे जलकेंद्र:- वारजे हाय-वे परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कोंढवे धावडे, न्यु कोपरे.
7)नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपींग भाग:- मुळा रोड, खडकी कॅन्टोनमेंट संपूर्ण परिसर, MES, HE Factory, हरी गंगा सोसायटी इत्यादी.

तरी या परिसरातील नागरिकांनी बुधवारी (दि.30) पाणी साठवून गुरुवारी व शुक्रवारी पाण्याचे योग्य ते नियोजन करावे असे आवाहन पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.