Pune News : पुण्यात या भागात मंगळवारी पाणीपुरवठा राहणार बंद

एमपीसी न्यूज – पुण्यातील वानवडी येथील शिंदे छत्री (Pune News) जवळील पुलावरील जल वितरण नलीकेची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी (दि.7) लष्क पंपीग हाऊसच्या अंतर्गत भागात पाणी पुरवठा बंद असणार आहे.

Pune Crime : खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

यामध्ये सुंपर्ण कॅन्टोनमेंट बोर्ड परिसर, कंमाड हॉस्पिटल एरिया, लष्कर भाग , प्रभाग क्र.25 मधील वानवडी गावठाण , एस.आर.पी.एफ वानवडी, एस.व्ही नगर, काळुबाई मंदिर परिसर, सोलापूर रोड, सोपानबाग, उदयबाग, डोबरवाडी व प्रभाग क्र.21 मधील बी.टी. कवडे रोड, भीमनगर, (Pune News) भारत फोर्ज कंपनी परिसर व संपुर्ण घोरपडी परिसर येथे मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे तर बुधवारी (दि.8) कमी दाबाने व उशीरा पाणी पुरवठा होणार आहे.

तरी नागरिकांनी याची दखल घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.