WB election : नंदीग्रामधून ममता बॅनर्जी पराभूत, शुभेन्दु अधिकारी 1953 मतांनी विजयी

0

एमपीसी न्यूज – पश्चिम बंगालच्या नंदीग्राममधील प्रतिष्ठेच्या लढतीत ममता बॅनर्जी पराभूत झाल्या आहेत. नंदीग्राम मधून भारतीय जनता पक्षाचे शुभेन्दु अधिकारी 1953 मतांनी विजयी झाले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पराभवामुळे तृणमूल काँग्रेसची अवस्था ‘गड आला पण सिंह गेला’ अशी झाली आहे.

सुरुवातीपासूनच मतमोजणीत ममता बॅनर्जी आणि शुभेन्दु अधिकारी यांच्यात मोठी टक्कर पहायला मिळाली. आतापर्यंतच्या निकालानुसार ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मधून 1953 मतांनी पराभव झाला आहे. सुरुवातीला ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्याचे स्पष्ट झाले मात्र, शुभेन्दु अधिकारी यांनी आक्षेप घेतल्यानंतर पुन्हा मतमोजणी करण्यात आली. फेर मतमोजणीत शुभेन्दु अधिकारी यांचा 1953 मतांनी विजय झाला असल्याचे घोषित केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी यावर आक्षेप घेत ‘सुरुवातीला विजय झाला नंतर पराभव झाल्याचे कसे सांगू शकता’ असा सवाल उपस्थित करत आपण न्यायालयात धाव घेणार असल्याचे म्हटले आहे.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला 215 जागांवर आघाडी मिळाली आहे तर, भाजप 75 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस मात्र एका जागेवर विजय झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment