Pune:- आम्ही महाराष्ट्रापुढे नतमस्तक आहोत – गृहमंत्री अनिल देशमुख

एमपीसी न्यूज: विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघात अनपेक्षितपणे भाजपला मोठा फटका बसला असून महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले आहेत. नागपूर आणि पुणे या भाजपच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येत आहेत. 

 

_MPC_DIR_MPU_II

गृहमंत्री असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी या निकालानंतर ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, “पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात स्पष्ट कौल देणाऱ्या महाराष्ट्रापुढं आम्ही नतमस्तक आहोत. सत्तेत राहण्यासाठीचे गणित आम्ही वर्षापूर्वीच जुळवले; आता भरभक्कम लोकसमर्थनही मिळवले. कालही आम्ही जनतेपुढे विनम्र होतो, आजही आहोत आणि सदैव राहु. असे म्हणत त्यांनी महाविकासआघाडीच्या विजयी शिलेदारांचे अभिनंदन केले.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. तर नागपूरमध्येही भाजपच्या उमेदवाराना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या दोन्ही ठिकाणच्या निवडणुका भाजपने प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. पुणे मतदार संघात तर भाजपला तब्बल वीस वर्षांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. वर्षानुवर्षे भाजपला साथ देणाऱ्या पुणे आणि नागपूर येथील मतदारांनी भाजपच्या गडाला खिंडार पाडत महाविकास आघाडीच्या पारड्यात आपले निर्णायक मत टाकले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.