Pune : हमे पहली गोली चलानी नही है, उधरसे गोली चली तो गिनना नही है – केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचा पाकिस्तानला इशारा

370 कलम निवडणुकीचा मुद्दा का असू शकत नाही? काँगेसला सवाल

एमपीसी न्यूज – हमे पहिली गोली चलानी नही है, अगर उधरसे गोली चली तो गिनना नही है, आशा शब्दांत केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आज पाकिस्तानला सुनावले. मुंबईवर 2008 मध्ये जेव्हा हल्ला झाला होता. तेव्हाची सरकार हताश होती. आम्ही देशाच्या सीमा मजबूत केल्या असून आताची सरकार दहशतवाद विरोधात सक्त कारवाई करण्यास मागे पुढे पाहत नाही, असेही त्यांनी बजावले.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत रविशंकर प्रसाद बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट, माजी विरोधी पक्षनेते उज्जवल केसकर, सरचिटणीस गणेश बिडकर, आरपीआयचे अध्यक्ष अशोक शिरोळे उपस्थित होते.

महाराष्ट्र ही शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा फुले यांची जन्मभूमी आहे. मग 370 कलम हा निवडणुकीचा मुद्दा का असू शकत नाही? असा सवाल रवीशंकर प्रसाद यांनी काँग्रेस – राष्ट्रवादीला विचारला. जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम रद्द झाल्यानंतर एक भी गोली चली नही. 106 नियम लागू करण्यात आले. हे कलम रद्द केल्याने महिलांना फायदा होणार आहे. यापूर्वी 42 हजार लोक मारले गेल्याची आठवणही त्यांनी करून दिली. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे, त्यासंदर्भात काँग्रेस का बोलत नाही, असा सवालही विचारला आहे. सोपिया भागातून 40 हजार मुस्लिम तरुण सैन्यात सहभागी होत आहेत.

महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीत काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधी यांना शोधत आहेत. आम्हाला सोडून विदेशात गेल्याची ओरड करीत आहेत. काँगेसचा प्रचाराचा टेकोऑफ काही होत नसल्याची टीकाही रवीशंकर प्रसाद यांनी केली. नोटबंदीचा निर्णयामुळे देश 30 वर्षे मागे गेल्याचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे म्हणणे आहे, त्यावर उत्तर देताना रवीशंकर प्रसाद म्हणाले, नोटबंदीनंतर आम्ही उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकली.

2019 ची लोकसभा निवडणूकही जिंकली. आणि महाराष्ट्र व हरियाणा येथेही आमचेच सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अर्थ तज्ज्ञ मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही काँग्रेस हरली. आणखी मला यावर बोलायचे नाही. दरम्यान, पिंपरी परिसरात सेंटर फॉर याक्सीलांस उभारणार असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला येण्यापूर्वी दगडूशेठ हलवाई गणपतीचे रवीशंकर प्रसाद यांनी दर्शन घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.