Pune News : आम्ही चार एजन्सीमार्फत सर्व्हे केला, पुण्यात 105 जागा जिंकू – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : भारतीय जनता पक्ष पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत 105 जागा जिंकेल असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाचे काही नगरसेवक इतर पक्षाच्या संपर्कात असल्याचा प्रश्न त्यांना विचारला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी हा दावा केलाय. पुण्यात एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही चार एजन्सीमार्फत सर्वे केला. या चारही सर्व्हेची गोळाबेरीज केल्यानंतर पुणे महानगरपालिकेत भाजपच्या 97 जागावरून 105 जागा होतील असा रिपोर्ट आहे. तसेच भाजपचे कुठलेही नगरसेवक इतरांच्या संपर्कात नाहीत. विरोधकांचे अनेक अस्त्र असतात त्यापैकी हे एक अस्त्र आहे. उलट तीनचा प्रभाग झाल्यामुळे राष्ट्रवादीचे काही नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केले.

तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुढच्या तीन-चार महिन्यात नगरसेवकांनी कशाप्रकारे काम केलं पाहिजे याच प्रशिक्षण देण्यात आलं. प्रभाग कसे होतील याचे अंदाज बांधले गेले.  पालिका निवडणुकीची भविष्यातली दिशा याचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.