Maharashtra News : अर्थचक्र चालवायचंय, कोविडचं अनर्थचक्र तोडायचंय – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून अन्य कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

कोरोना काळात अर्थचक्र चालवायचे आहे आणि कोविडचे अनर्थचक्र तोडायचे आहे. या लढ्यात आपल्या सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. असे ट्विट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय कोरोना साखळी तोडणे अशक्य आहे.

रविवारी (दि. 4) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विकेंड लॉकडाऊन, दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी आणि अन्य काही कठोर नियम लागू करण्यात आले. राज्यात कोरोना बधितांची संख्या आश्चर्यकारकपणे वाढत आहे. ती कमी करणे राज्य शासनापुढील सर्वात मोठे आवाहन आहे. त्यात अपुऱ्या पडत असलेल्या आरोग्य सुविधा ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे नागरिकांनी आणखी स्वयंशिस्त राखणे अत्यावश्यक आहे.

मिनी लॉकडाऊन लागू केले असले तरीही अर्थचक्र थांबवून चालणार नाही. उद्योग धंदे सुरू राहायला हवेत. हे सगळं सुरू ठेऊन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

ट्विटर लिंक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.