Pune : पुण्यातील आठही जागा अधिक मताधिक्याने जिंकू

प्रकाश जावडेकर यांचा विश्‍वास

एमपीसी न्यूज – पुण्यातील आठही जागांवर भाजपचे आमदार आहेत. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत या आठही जागा आम्ही पुन्हा एकदा अधिक मताधिक्याने जिंकू असा विश्‍वास केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.

पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या बूथप्रमुखांचा मेळावा आज बिबवेवाडीतील अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला जावडेकर मार्गदर्शन करीत होते.

शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, शहर सरचिटणीस दीपक मिसाळ, उज्ज्वल केसकर, महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, सुनील कांबळे, हरिष परदेशी, जितेंद्र पोळेकर, संजय गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जावडेकर पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्रात भाजपचे आकर्षण वाढले आहे. गेल्या पाच वर्षांत केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली विकासाची गती वाढली आहे. योजना नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. त्याचा लोकांवर चांगला परिणाम होत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुतीला तीन चतुर्थांश जागा मिळतील.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.