Weather Report : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोंकण- गोवा व मराठवाड्यात मुसळधार पाऊसाची शक्यता
Weather Forecast of Maharashtra.

एमपीसी न्यूज – मान्सूनने देश व्यापल्यानंतर राज्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासांत कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला आहे.
सकाळ पासूनच उन्हाचा चटका वाढला होता. दुपारनंतर जमा झालेल्या ढगामुळे उकाडा अणखीनच वाढल्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :
कोकण आणि गोवा : वेंगुर्ला 10, लांजा 6, अलिबाग, देवगड, कणकवली, मालवण, म्हापसा, माथेरान, सावंतवाडी 5 प्रत्येकी, मुंबई (सांताक्रूझ), रामेश्वरी 4 प्रत्येकी, दोडामार्ग, कुडाळ, मुरुड, केपे, राजापूर, तळा 3 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), कानकोना, मुळदे 2 प्रत्येकी, डहाणू, दापोली, गुहागर, हरनाई, पणजी (गोवा), पेण, रत्नागिरी 1 प्रत्येकी.
मध्य महाराष्ट्र : इंदापूर 9, मेढा 8, अमळनेर, चोपडा, माळशिरस 6 प्रत्येकी, गगनबावडा 5, दहिवडी माण, नांदगाव, पंढरपूर 4 प्रत्येकी, बार्शी, मालेगाव, मंगलवेढा, पारोळा, फलटण 3 प्रत्येकी, इगतपुरी, कवठे महाकाळ 2 प्रत्येकी, आटपाडी, दौंड, गिरना धरण, लोणावळा (कृषी), महाबळेश्वर, पुणे, शिरपूर 1 प्रत्येकी.
मराठवाडा : गंगापूर 9, कन्नड 5, देवणी, हदगांव, फुलंब्री, रेनापूर, सिल्लोड 4 प्रत्येकी, अंबेजोगाई, आष्टी, बीड, भोकरदन, चाक्र, गेओराई, पाटोदा 3 प्रत्येकी, लातूर, मनवत, निलंगा, परळी वैजनाथ 2 प्रत्येकी, अंबड, बदनापूर, भूम, घनसावंगी, हिमायतनगर, खुलताबाद, माजल गाव, पैठण, परभणी, शिरूर अनंतपाल, उदगीर 1 प्रत्येकी.
विदर्भ : लोणार, मालेगाव, सिंधखेड राजा 3 प्रत्येकी, आमगाव, देऊळगाव राजा, दिग्रस, गोरेगाव, लाखंदूर, मंगळुरपीर, मानोरा, नांदगाव काजी, पातूर, रिसोड, साकोली, सावनेर 2 प्रत्येकी, आष्टी, बार्शी टाकळी, बटकुली, हिंगणा, कारंजा लाड, काटोल , मेहकर, मोर्सी, नागभिड, पारशिवनी, सालेकसा, तिरोरा, वाशिम 1 प्रत्येकी.
घाटमाथा : कोयना (नवजा) 3, धारावी 2, अम्बोणे, लोणावळा (टाटा), लोणावळा (ऑफिस), शिरगाव प्रत्येकी.
पुढील हवामानाचा अंदाज
29 जून : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
30 जून : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
1 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
2 जुलै : कोंकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
3 जुलै : कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
इशारा
29 जून : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोंकण गोवा व मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
30 जून : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोंकण गोव्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
1 जुलै : कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
2 जुलै : कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
3 जुलै : कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.