Weather News : मध्य महाराष्ट्र, मराठवाडासह देशाच्या विविध भागात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा अंदाज

एमपीसी न्यूज – भारतीय हवामान शास्त्र विभाग (आयएमडी) च्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राने जारी केलेल्या भारतीय हवामान वृत्तानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडासह देशाच्या विविध भागात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात ताशी 30-40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गुजरात आणि ओडिशा किनारपट्टीवर काही तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

28 ते 30 एप्रिल दरम्यान दक्षिण कर्नाटक आणि उत्तर केरळमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .

29 आणि 30 एप्रिलला विदर्भासह देशाच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.