Weather News Today : देशातून मान्सून माघारी! शहरातील पाऊस थांबणार!

एमपीसी न्यूज : यंदा संपूर्ण देशात धो-धो बरसल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वारे (मान्सून) देशाच्या बहुतांश भागातून माघारी परतले असल्याचे हवामान विभागाने बुधवारी स्पष्ट केले.

पश्चिम राजस्थानातून 26 सप्टेंबर रोजी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले होते. त्यानंतर गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मान्सून रेंगाळला होता. त्यानंतर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात बर्‍याच ठिकाणी अतिवृष्टी झाली. चार दिवसांपूर्वी खान्देश आणि विदर्भाच्या काही भागातून मान्सून परतला असल्याचे हवामान विभागाने नमूद केले होते.

_MPC_DIR_MPU_II

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र विरल्यानंतर वार्‍याची दिशा बदलली आहे. त्यामुळे भारताच्या उर्वरित भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास वेगाने झाला.  आता दक्षिण भारतात ईशान्य मान्सून सक्रिय होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात पावसाला सुरूवात होणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.

शहरातील पाऊस थांबणार

शहरात मागील काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे.  सोमवारनंतर आकाश निरभ्र असणार आहे. पाऊसही थांबणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.