Weather News : पुणे गारठले, तापमानाचा पारा १० अंश सेल्सियस खाली

किमान तापमान 9.8 अंशावर

एमपीसी  न्युज   : मागील काही दिवसांपासून किमान तपमानात सातत्याने घट होत आहे. गुरुवारी पुण्यातील तपमानात तब्बल 9. 8 अंशापर्यंत घसरले.  ते बुधवारी 10 .6 अंश होते.  वार्‍यातील गारव्यामुळे दिवसभर थंडी जाणवत होती. मात्र सायंकाळ होताच बोचर्‍या थंडीचे रूपांतर कडाक्याच्या थंडीत झाले. रात्री त्यात भर पडल्याने अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

 

सद्य:स्थितीत पूर्वेकडून उत्तरेकडे वारे वाहत आहेत. त्यामुळे हवेत गारवा वाढला आहे. तसेच आकाश नीरभ्र असल्याने किमान तपमानात घट होत आहे. मात्र लवकरच उत्तरेकडून पूर्वेकडे वारे वाहण्यास सुरूवात होईल. तेव्हा मात्र किमान तपमानात लक्षणीय घट होईल, थंडीत मोठी वाढ होईल. असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तीन दिवसांपूर्वी शहरात 13 अंश किमान तपमानाची नोंद झाली होती. मात्र काल चक्क 9 अंशापर्यंत तपमान घसरले. त्यामुळे सकाळपासूनच थंडीचा प्रभाव जाणवत होता.

 

दिवसेंदिवस थंडी वाढत असल्याने काल सकाळपासूनच लोक घराबाहेर पडताना गरम कपड्यांचा वापर करीत होते. रात्री संपूर्ण शहरात कडाक्याची थंडी पडल्याने रस्त्यांवरील वाहनांची संख्याही घटली होती. तसेच पहाटेपर्यंत सर्वत्र धुके पसरले होते. पहाटे प्रचंड थंडी जाणवत असल्याने सकाळी फिरायला जाणार्‍यांच्या संख्येतही घट झाली आहे. हवेत गारवा कायम असल्याने दिवसभर नागरिक गरम कपडे परिधान करीत आहेत. आज (गुरूवारी) किमान तपमानात किचिंत वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. त्यानंतर मात्र सुमारे चार दिवस किमान तपमान स्थिर असणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.