Weather Report : येत्या 24 तासांत पुण्याजवळ घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत कोकण गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता पु्णे वेधशाळेने वर्तविली आहे. पुणे परिसरात मध्यम स्वरुपाच्या तर घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस किंवा अतिवृष्टी होऊ शकते, असा इशाराही दिला आहे. मुंबई व उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल तसेच सोसाट्याचा वारा वाहील, असे हवामान खात्याच्या पत्रकात म्हटले आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: भिरा 20, माथेरान 16, कल्याण 13, जव्हार, तलासरी 12 प्रत्येकी, कर्जत, माणगाव, विक्रमगड 11 प्रत्येकी, खालापूर, , सुधागड पाली, ठाणे, उल्हासनगर 11 प्रत्येकी, अंबरनाथ, भिवंडी, चिपळूण, डहाणू, वाडा 9 प्रत्येकी , पोलादपूर 8, दोडा मार्ग, मंडणगड, म्हसळा, मुरबाड, रोहा, शहापूर 7 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), खेड, पालघर, पनवेल, पेण 6 प्रत्येकी, मुरुड, वल्पोई 5 प्रत्येकी, कणकवली, महाड, मुंबई (सांतक्रूझ), श्री वर्धन,
उरण 4 प्रत्येकी, अलिबाग, कुडाळ, लांजा, म्हापसा, केपे, सांगे 3 प्रत्येकी, गुहागर, पणजी (गोवा), पेडाणे, राजापूर, सावंतवाडी 2 प्रत्येकी, कानकोना, दाभोलीम (गोवा), हरनाई, रामेश्वर कृषी, संगमेश्वर देवरूख, वैभववाडी, वेंगुर्ला 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: इगतपुरी, लोणावळा (कृषी) 15 प्रत्येकी, नवापूर 14, महाबळेश्वर 13, ओझरखेडा, राधानगरी, वेल्हे 9 प्रत्येकी, पेठ 8, त्र्यंबकेश्वर 7, हर्सूल, सुरगाना 6 प्रत्येकी, पौड मुळशी 5, एरंडोल 4, अक्कलकुवा, चांदगड, दहीगाव, जळगाव, जामनेर, जावली मेधा, मुक्‍ताईनगर, पन्हाळा, पारोळा, शाहूवाडी, वडगाव मावळ, यावल 3 प्रत्येकी, अमळनेर, आंबेगाव घोडेगाव, भोर, भुसावळ, धारणगाव, दिंडोरी, गगनबावडा , ओझर, पाटण,
शहादा, तळोदा 2 प्रत्येकी, आजारा, अकोले, चांदवड, चोपडा, धुळे, कळवण, खंडाळा बावडा, कोरेगाव, मालेगाव, मुळदे, निफाड, पुणे (लोहगाव), रावेर, सातारा, शिरपूर , शिरूर घोडनाडी, सिंद खेडा, वाई 1 प्रत्येकी.

मराठवाडा: किनवट, माहूर ३ प्रत्येकी, अर्धापूर, देगलूर, परभणी 2 प्रत्येकी, औंधा नागनाथ, बदनापूर, भोकरदन, बिलोली, हदगाव, हिमायतनगर, कळमनुरी, कंधार, मंठा, मुखेड, नायगाव खैरगाव, सेनगाव, सिल्लोड, सोहेगाव, तुळजापूर, उमरी 1 प्रत्येकी.

विदर्भ: कुरखेडा 8, पौनी 6, आमगाव, भिवापूर, कोरची, लाखंडूर, नाग भीड, उमरेड 5 प्रत्येकी, चिमूर, गोंदिया, तिरोरा 4 प्रत्येकी, अर्जुनी मोरगाव, आर्मोरी, भामरागड, ब्रम्हपुरी, चांदूर बाजार, देवरी, देसाईगंज, गडचिरोली, गोरेगाव, जळगाव जामोद, कुही, मारेगाव, मोर्सी, नागपूर, साकोली, सालेकसा, तिवसा, तुमसर, वणी 3 प्रत्येकी, अहीरी, अकोला, आर्णी, आर्वी, आष्टी, चंद्रपूर, चिखलदरा, देवळी, हिंगणा, कामठी, कारंजा लाड, काटोल, खारंगा, मालेगाव, मलकापूर, मंगळुरपीर, मानोरा, नंदुरा, नरखेडा, पंढरकेवढा, पातूर, रामटेक, सडक अर्जुनी, समुद्रपूर, संग्रामपूर, सावनेर, सेलू, वरोरा, वरुड, वाशिम 2 प्रत्येकी, बार्शी टाकळी, भद्रावती, चाळीस, दर्यापूर, दिग्रस, एटापल्ली, घाटंजी, हिंगणघाट, कळंब, कळमेश्वर, खामगाव, कोरपना, महागाव, मोदा, मेहकर, मोहाडी, मोताळा, मुळ, परतवाडा, पुसद, राळेगाव, सोली, शिंदेवाहि, सिरोंचा, तेहरा, उमर वर्धा, यवतमाळ, झरी झमनी 1 प्रत्येकी

घाटमाथा: ताम्हिणी, शिरगाव, अम्बोणे 21 प्रत्येकी, दावडी 20, डोंगरवाडी 19, लोणावळा(टाटा), लोणावळा(ऑफिस) 14 प्रत्येकी, खांडी, वाहनगाव, वळवण 12 प्रत्येकी, खोपोली 11, भिवपुरी, ठाकूरवाडी 9, कोयना (पोफळी), शिरोता 8 प्रत्येकी, कोयना (नवजा) 7,

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव: अप्पर वैतरणा 15, तुळशी 11, मध्य वैतरणा 10, वैतरणा 9, भातसा, तानसा 7 प्रत्येकी, विहार 6.

पुढील हवामानाचा अंदाज:

14 ऑगस्ट: कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

15 ऑगस्ट: कोकण गोवा, मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

16 ऑगस्ट: गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

17 ऑगस्ट: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा:

14 ऑगस्ट: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

15 ऑगस्ट: कोकण गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

16 ऑगस्ट: कोकण गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

17 ऑगस्ट: कोकण गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पडण्याची
शक्यता. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.