-MPC-TOP-MOST-BANNER-I

Weather Report : पुणे आणि परिसरात मध्यम, घाट विभागात जोरदार पावसाची शक्यता

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- येत्या 24 तासांत पुणे आणि आसपासच्या परिसरात मध्यम तर घाट विभागात जोरदार पावसाची तसेच आज, शुक्रवारी आणि उद्या, शनिवारी मध्यम स्वरूपाचा तर घाट विभागात मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोकण गोव्यात अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्रात काही भागात जोरदार तर तुरळक भागात मुसळधार व मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडला. कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) पुढीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा : माथेरान 23, डहाणू 22, बेलापूर (ठाणे) 21, वसई 18, पनवेल 17, पालघर, सुधागड पाली 14, खालापूर 13, रोहा 12, ताला 11, कर्जत, माणगाव 10, पेन, पेडणे 9, चिपळूण, दोडा मार्ग, खेड, लांजा, मंडणगड, मुंबई (सांताक्रूझ), पोलादपूर, संगमेश्वर देवरुख, वाल्पोई ८, महाड, म्हसळा, श्रीवर्धन 7, केपे, उरण, वैभववाडी, वाडा 6, मुळदे, राजापूर, सावंतवाडी 5, कुडाळ 4, अलिबाग, दाभोलीम (गोवा), गुहागर, कणकवली, म्हापसा, मुरुड, रत्नागिरी, विक्रमगड 3, दापोली, हरनाई, मडगाव, मोखेडा, सांगे 2, कानाकोना, देवगड, मार्मागोवा, वेंगुर्ला 1.

मध्य महाराष्ट्र : राधानगरी 18, लोणावळा (कृषी) 13, चांदगड 12, महाबळेश्वर 11, आजारा, वेल्हे 9, गगनबावडा 8, भोर, सातारा 7, हातकणंगले, पोड मुळशी 6, गारगोटी / भुदरगड, शाहुवाडी 5, इगतपुरी 4, कोल्हापूर, वडगाव मावळ 3, धुळे, जुन्नर, ओझर खेडा, आंबेगाव, घोडेगाव, खेड राजगुरूनगर, पुरंदर सासवड, सांगली, तासगाव, त्र्यंबकेश्वर 1.
मराठवाडा : मंथा 11, किनवट 7, सिल्लोड 4, भोकरदन, जिंतूर, परतूर 2, अर्धापूर, लातूर, परभणी, फुलंब्री, सेलू, वसमत 1.

विदर्भ: भिवापूर, कंपटी, कोरची, लाखनी, नेर 5, ब्रहमपुरी, हिंगणा, पर्सोनी 4, बटकुली, भंडारा, चिमूर, देसाईगंज, घाटंजी, कुही, लखंदूर, नाग भीर, सडक अजुनी, समुद्रपूर, सेलू, उमरेड, अर्जुनी मोरगाव, बाभूळगाव, भद्रावती, गोंड पिंपरी, कुरखेडा, मौदा, मेहकर, मोहाडी, नांदगाव काजी, पंढरीकवडा, पौनी, शिंदेवाही, झरी झमानी 2, बल्लारपूर, चंद्रपूर चिखली, देउळगाव राजा, देवळी, गडचिरोली, कळंब, कळमेश्वर, लोणार, महागाव, मलकापूर, मुल, रिसोड, साकोली, साओली, सावनेर, सिंधखेड राजा, सिरोंचा, तेल्हारा, वर्धा, वरोरा 1.

घाटमाथा : लोणावळा(टाटा) 28, कोयना (नवजा) 24, शिरगाव 22. अम्बोने 19, इुंगरवाडी 15, दवडी 14, लोणावळा(ऑफिस) 13, वलवण, भिरा 12 प्रत्येकी, खोपोली, ताम्हिणी 11 प्रत्येकी, कोयना (पोफळी), धारावी 8 प्रत्येकी, शिरोटा 6, ठाकूरवाडी, वाणगाव 5 प्रत्येकी.

कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघ गर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn