Weather Report : मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला.

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात येत्या 24 तासांत मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊसाची शक्यता आहे. तसेच कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता असून उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोकण गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार; मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमीमध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा : भिरा 13, कल्याण, माथेरान, वसई 10 प्रत्येकी, अंबरनाथ, जव्हार, ठाणे, विक्रमगड 9 प्रत्येकी , बेलापूर (ठाणे), पनवेल, तलासरी, उल्हासनगर 8 प्रत्येकी , भिवंडी, मुंबई (सांताक्रूझ), पेण, सुधागड पाली 7 प्रत्येकी, कर्जत, पालघर, उरण 6 प्रत्येकी, डहाणू, मंडणगड, मोखेडा, केप, रोहा, शहापूर 5 प्रत्येकी, देवगड, दोडा मार्ग, खालापूर, लांजा, महाड, माणगांव, म्हसळा, मुरुड, फोंडा, संगमेश्वर देवरुख, वैभववाडी, वाडा 4 प्रत्येकी, कानकोना, दाभोलीम ( गोवा), हरनाई, कणकवली, खेड, कुडाळ, मालवण, म्हापसा, मडागव, पेडणे, पोलादपूर, सावंतवाडी 3 प्रत्येकी, अलिबाग, मुरबाड, रामेश्वर कृषी, श्रीवर्धन 2 प्रत्येकी, चिपळूण, राजापूर, रत्नागिरी, वेंगुली 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : इगतपुरी 10, ओझरखेडा 9, महाबळेश्वर 8, आजारा, गगनबावडा, राधानगरी 6 प्रत्येकी, भुसावळ, लोणावळा (कृषी), शाहूवाडी, वेल्हे 5 प्रत्येकी, चांदगड, हर्सूल, पन्हाळा, पेठ 4 प्रत्येकी, अमळनेर, जावळी मेधा, पारोळा, पाटण, पौड मुळशी, रावेर, त्र्यंबकेश्वर, यावल 3 प्रत्येकी, भोर, बोदवड, जळगाव, शिराळा, शिरपूर 2 प्रत्येकी, आंबेगाव घोडेगाव, चोपडा, धरणगाव, दिंडोरी, एरंडोल, गारगोटी, जामनेर, कागल, कराड नंदुरबार, पुणे (लोहगाव), सातारा, शहादा, सुरगाणा 1 प्रत्येकी.

मराठवाडा : औंधा नागनाथ, देवणी, नायगाव खैरगाव, नांदेड, परभणी, पूर्णा, रेणापूर 1 प्रत्येकी.

विदर्भ : वर्धा 6, आमगाव 5, साकोली 4, अमरावती, बटकुली, भामरागड, धारणी, गोरेगाव, हिंगणा, काटोल, खरंगा, कोरची, कुही, लाखनी, नरखेडा, सडक अर्जुनी, समुद्रपूर, सेलू, उमरेड 3 प्रत्येकी, आर्वी, आष्टी, भंडारा , भिवापूर, चांदूर बाजार, दर्यापूर, देवळी, देवरी, धामणगाव, एटापल्ली, मलकापूर, मुल, नागपूर, नांदगाव काजी, सालेकसा, संग्रामपूर, तिवासा 2 प्रत्येकी, अहीरी, अकोला, अर्जुनी मोरगाव, आर्मोरी, बल्लारपूर, बुलढाणा, चांदूर, चिखलदरा, धानोरा, गडचिरोली, कळमेश्वर, कामठी, कारंजा लाड, मोदा, मोहाडी, मूर्तिजापूर, नंदुरा, परातवाडा, पातूर, पोनी, पारशिवनी, पोंभुणी, साओली, सावनेर, शेगाव, सिरोंचा, तिरोरा, तुमसर ! प्रत्येकी.

घाटमाथा : ताम्हिणी 17, कोयना (नवजा), इुंगरवाडी, शिरगाव, दावडी 15 प्रत्येकी, अम्बोणे 10, खोपोली 6, कोयना(पोफळी), लोणावळा(ऑफिस), लोणावळा(टाटा) 5 प्रत्येका, वळवण 4 खंद, शिरोटा 3 प्रत्येकी, ठाकूरवाडी 2, भिवपुरी, वाणगाव 1प्रत्येकी.

_MPC_DIR_MPU_II

पुढील हवामानाचा अंदाज :

23 ऑगस्ट : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

24 ऑगस्ट : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

25 ऑगस्ट: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

26 ऑगस्ट : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी; विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा :

२३ ऑगस्ट: मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

24-25 ऑगस्ट: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

पुण्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.