Maharashtra Weather Report : येत्या 24 तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

कोकण गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता : Chance of heavy rains in sparse places in Vidarbha in next 24 hours

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, कोकण गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोंकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा : माथेरान 21, पालघर, वाडा 12 प्रत्येकी, भिरा 10 प्रत्येकी, चिपळूण, मंडणगड, पनवेल 9 प्रत्येकी, कल्याण, महाड, पोलादपूर, तलासरी, ठाणे 8 प्रत्येकी , खेड, लांजा, मोखेडा, राजापूर, रोहा, वैभववाडी, विक्रमगड 7 प्रत्येकी डहाणू , जवाहर, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी, कणकवली, कर्जत, म्हसळा, मुंबई (सांताक्रूझ) 5 प्रत्येकी, हर्णे, माणगांव, मुरबाड,, अलिबाग, बेलापूर (ठाणे), दोडा मार्ग, खालापूर, कुडाळ, म्हापसा, मुरुड, पेन, फोंडा , केप, संगमेश्वर देवरुख, सावंतवाडी, श्रीवर्धन, सुधागड पाली, वसई 3 प्रत्येकी, गुहागर, मालवण, पेडणे, रामेश्वरी, रत्नागिरी, सांगे, उरण, वेंगुर्ला 2 प्रत्येकी, कानकोन, दाभोलीम (गोवा), देवगड 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा 11, इगतपुरी, महाबळेश्वर, ओझरखेडाट प्रत्येकी, पेठ, राधानगरी 7 प्रत्येकी, भडगाव, चांदगड, पारोळा, शाहूवाडी, वेल्हे 6 प्रत्येकी, लोणावळा (कृषी), पन्हाळा, पाटण, शिराळा 5 प्रत्येकी, आजरा, भोर, गारगोटी / भुदरगड, कागल, कळवण, कोल्हापूर, मुळदे, नवापूर, सिन्नर, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर,, देवळा, गडाहिंग्लज, जावली मेधा, पाचोरा 2 प्रत्येकी, भुसावळ, बोडावद, चाळीसगाव, चोपडा, धुळे, दिंडोरी, जळगाव, कराड, करमाळा, कोरेगाव, मालेगाव, मुक्ताईनगर, ओझर , पौड मुळशी, रावेर, सातारा, सतना बागलाण, वडगाव मावळ, वाई, वाळवा इस्लामपूर 1 प्रत्येकी.

मराठवाडा : माहूर 6 प्रत्येकी, अहमदपूर, किनवट 4 प्रत्येकी, देगलूर, जाफराबाद, जळकोट, सेनगाव, सोयगाव 3 प्रत्येकी, भोकरदन, चाकूर, हदगाव, हिंगोली, जिंतूर, कळमनुरी, मुखेड, सिल्लोड, तुळजापूर 2 प्रत्येकी , औंधा नागनाथ, बदनापूर, हिमायतनगर, कन्नड, लोहारा , निलंगा, पैठण 1 प्रत्येकी..

विदर्भ : अहिरी 7, भामरागड, बुलढाणा, दिग्रस 5 प्रत्येकी, एटापल्ली, गोंदिया, 4 प्रत्येकी, आर्णी, चामोर्शी, चिखली, जिवती, महागाव, मानोरा, मुल चेरा, पुसद, रिसोड, सिरोंचा 3 प्रत्येकी, बार्शी टाकळी, गोंड पिपरी, कारंजा लाड , कोरपना, लोणार, मुल, सिंधखेड राजा, उमर खेड, जरी झमानी 2 प्रत्येकी, अकोला, आमगाव, अमरावती, बाळापूर, बल्लारपूर, दारव्हा, देऊळगाव राजा, धानोरा, कोरची, मंगलूरपीर, मारेगाव, मेहकर, नांदगाव काजी, पंढरीकावडा, पातूर, राजुरा , साओली, वाशिम 1 प्रत्येकी.

घाटमाथा : कोयना (नवजा) 18, दावडी, डोंगरवाडी 12, शिरगाव कोयना(पोफळी), ताम्हिणी 11 प्रत्येको, वळवण, अम्बोणे 8 प्रत्येकी, लोणावळा(ऑफिस ७, लोणावळा(टाटा), खंद 5 प्रत्येकी, खोपोली 4, शिरोटा, ठाकूरवाडी, वाणगाव 3 प्रत्येकी, भिवपुरी 2

पुढील हवामानाचा अंदाज:

18-19 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

20 ऑगस्ट : कोकण गोवा, मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

21 ऑगस्ट : गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

22 ऑगस्ट : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

इशारा:

19 ऑगस्ट : विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. कोकण गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍्यता.

20 ऑगस्ट : विदर्भात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.