Weather Report : पुणे व मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता

कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी; विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

एमपीसी न्यूज – पुण्यात येत्या 24 तासांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्याता आहे. मुंबई शहर व उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतील, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा : अंबरनाथ, जव्हार, खालापूर 4 प्रत्येकी, भिरा, तलासरी, उल्हासनगर 3 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), डहाणू, मंडणगड, माणगाव, माथेरान, पनवेल, पोलादपूर, विक्रमगड 2 प्रत्येकी, भिवंडी, कानाकोना, चिपळूण, दोडा मार्ग, गुहागर, कल्याण, कणकवली, खेड, कुडाळ, लांजा, म्हापसा, म्हसळा, मुंबई (संताक्रूझ), मुरबाड, पांझीम (गोवा), पेडणे, केप, राजापूर, सावंतवाडी, शहापूर, श्रीवर्धन, सुधागड पाली, वलपोई, वाडा 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : इगतपुरी, वेल्ह, हर्सून एफएमओ, महाबळेश्वर, पेठ, तळोदा, त्र्यंबकेश्वर, आजारा, गगनबावडा, जावली मेधा, नवापूर, ओझरखेडा एफएमओ, पौड मुळशी, सुरगना 2, दिंडोरी, राधानगरी, शाहूवाडी, सिन्नर 1 प्रत्येकी.

घाटमाथा : शिरगाव 7, दावडी 6, कोयना (नवजा) 5, ताम्हिणी 4, अम्बोणे, डोंगरवाडी 3 प्रत्येकी, लोणावळा(टाटा), लोणावळा(ऑफिस), शिरोटा, वळवण, वाणगाव, कोयना, खोपोली 1 प्रत्येकी

पुढील हवामानाचा अंदाज :

26 ऑगस्ट : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी; विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

27 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

28 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

29 ऑगस्ट : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा:

26 -28 ऑगस्ट : विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

29 ऑगस्ट : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.