Weather Report : पुणे व मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत पुण्यात मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबईत आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी; मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा : पेडणे 5, शहापूर 4, अंबरनाथ 3, चिपळूण 2, कानकोन, डोडा मार्ग, जावर, कल्याण, कर्जत, खालापूर, खेड, मोखेडा एफएमओ, केपे, सुधागड पाली, उल्हासनगर 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : अकोले, संगमनेर 6, रहाता 4, इगतपुरी, जामखेड, कराड, 3 प्रत्येकी, बारामती, माढा, महाबळेश्वर, शिराळा, शिरूर घोडनदी, विटा 2 प्रत्येकी, कोपरगाव, पंढरपूर, पन्हाळा, राधानगरी, सिन्नर, तासगाव 1 प्रत्येकी.

मराठवाडा : रेणापूर 6, कैज 3, तुळजापूर, वैजापूर 2 प्रत्येकी, औंढा नागनाथ, किनवट, उस्मानाबाद, परंडा 1 प्रत्येकी.

विदर्भ : कोरपना 3, कुरखेडा 1.

घाटमाथा: कोयना(खोपोली) 1.

पुढील हवामानाचा अंदाज :

08 सप्टेंबर : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

06 सप्टेंबर : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

07-08 सप्टेंबर: कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा:

05 सप्टेंबर : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

06 सप्टेंबर: कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनजा व विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

07 सप्टेंबर: कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

08 सप्टेंबर: विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.