Weather Report : पुणे व मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता

गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

एमपीसी न्यूज – पुणे व आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी; मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा : मोखेडा 4, माथेरान, पेण 3 प्रत्येकी, लांजा, रोहा, उरण 2 प्रत्येकी, कणकवली, खेड, मंडणगड, मुंबई (कुलाबा), मुरुड, रामेश्वर कृषी, रत्नागिरी, सुधागड पाली, वैभववाडी 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: धुळे, पारोळा 8 प्रत्येकी, अमळनेर, भुसावळ, दहीगाव, एरंडोल, इगतपुरी 6 प्रत्येकी, अकोले, भडगाव 5 प्रत्येकी, लोणावळा (कृषी) 4, गिरना धरण, हर्सूल, नंदुरबार, नेवासा 3 प्रत्येकी, बोदवड, खटाव वडूज, ओझर, पेठ, साक्री 2 प्रत्येकी, चाळीसगाव, चांदगड, धरणगाव, जामनेर, खंडाळा बावडा, महाबळेश्वर, मुलदे, ओझरखेडा, राधानगरी, रावेर 1 प्रत्येकी.

विदर्भ: नागपूर 5, नंदुरा 4, अकोला, भामरागड, पातूर 3 प्रत्येकी, हिंगणा, मलकापूर 2 प्रत्येकी, खामगाव 1.

घाटमाथा : कोयना (पोफळी) लोणावळा (ऑफिस) 6 प्रत्येकी, लोणावळा (टाटा) 3, कोयना (नवजा), वळवण, अम्बोणे १ प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

06 सप्टेंबर : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

07 सप्टेंबर: कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

08-09 सप्टेंबर: कोकण गोवा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा :

06 सप्टेंबर : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

07 सप्टेंबर : कोंकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

08-09 सप्टेंबर : विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.