Weather Report : पुण्यात व मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता

गेल्या 24 तासांत कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

एमपीसी न्यूज – पुणे आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :

कोंकण आणि गोवा: मार्मागोवा 8, दाभोलीम (गोवा), माणगाव 5 प्रत्येकी, केपे, सांगे 4 प्रत्येकी, दोडामार्ग, गुहागर, मडगाव, पेडणे 3 प्रत्येकी, अलिबाग, भिवंडी, कानकोना, कणकवली, महाड, म्हापसा, माथेरान, सावंतवाडी, वाल्पोई 2, देवगड, कुडाळ, मंडणगड, म्हसळा, मोखेडा, मुरुड, पालघर, पेण, रामेश्वरी, रत्नागिरी, रोहा, सुधागड पाली, वैभववाडी, वेंगुर्ला 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : शिरूर घोडनदी, श्रीरामपूर 3 प्रत्येकी, चांदवड, निफाड, पारनेर 2 प्रत्येकी, गगनबावडा, इगतपुरी, जाम खेड, लोणावळा (कृषी), महाबळेश्वर, पन्हाळा, राहुरी, सुरगाणा, वेल्हे 1 प्रत्येकी.

मराठवाडा: अंबड 4, घनसावंगी 2, औंधा नागनाथ, औरंगाबाद, गंगापूर, पैठण, पाथरी 1 प्रत्येकी

विदर्भ: देवळी, दिग्रस, कुरखेडा, लखनदूर 1 प्रत्येकी

घाटमाथा: कोयना( नवजा) 4, लोणावळा (टाटा), लोणावळा (ऑफिस), खोपोली 2 प्रत्येकी, शिरगाव, वाळवण, ताम्हिणी, इंगरवाडी 1 प्रत्येकी,

पुढील हवामानाचा अंदाज:

26 सप्टेंबर: कोंकण-गोवा व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

27-28 सप्टेंबर: गोव्यासह संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

29 सप्टेंबर: मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस तर कोंकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस शक्‍्यता.

इशारा:

26-27 सप्टेंबर: विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता.

28-29 सप्टेंबर: काही नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.