Weather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता 

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत पुणे आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: कोंकण गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात हवामान कोरडे होते.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेत्रेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: कणकवली 5, देवगड, वैभववाडी 3 प्रत्येकी, डहाणू, कुडाळ, रत्नागिरी, वाल्पोई 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: कोरेगाव 3, खटाव वडूज, पलूस 2 प्रत्येकी, इगतपुरी, ओझरखेडा 1 प्रत्येकी

घाटमाथा: काही नाही.

पुढील हवामानाचा अंदाज:

06-07 ऑक्टोबर: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता.

08-09 ऑक्टोबर: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

इशारा:

06-07 ऑक्टोबर: काही नाही

08-09 ऑक्टोबर: विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.