Weather Report : पुणे, मुंबईत हलका तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Chance of light rain in Pune, Mumbai and torrential rain in sparse places in Vidarbha

एमपीसी न्यूज – राज्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर, विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची, तर  मुंबई – पुण्यात मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. मुंबईत आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतील, अशी शक्यता पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे.

पुणे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल उत्तर अरबी समुद्राच्या आणि कच्छच्या उर्वरित भागात, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात व उत्तराखंडच्या काही भागात झाली आहे.

मागील 24 तासांत कोकण – गोवा, विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

# गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे ( दि. 23, सकाळी 8.30 वाजेपर्यंत)

कोकण आणि गोवा : मार्मगोवा, उल्हासनगर 6 प्रत्येकी, मालवण, पणजी (गोवा) 4 प्रत्येकी, कानकोन, दाभोलीम (गोवा) , कुडाळ, म्हापसा, मुरुड, पेडणे, संगमेश्वर, देवरूख 3 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), देवगड, दोडामार्ग, कल्याण, कणकवली, लांजा, मडगाव, केपे, सांगे, सावंतवाडी, सुधागड पाली, वेंगुर्ला 2 प्रत्येकी, अलिबाग, भि, चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड, माथेरान, म्हसाळा, मुळदे, मुंबई (कुलाबा), पनवेल, पोलादपूर, राजापूर, रामेश्वर (कृषी) , रत्नागिरी, रोहा, श्रीवर्धन, वैभववाडी 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा 3, माळशिरस, फलटण, राधानगरी, श्रीरामपूर 1 प्रत्येकी.

मराठवाडा : माहूर 1.

विदर्भ : आमगाव, गोरेगाव, कारंजा 5 प्रत्येकी, कुही, नांदगाव काजी, सालेकसा 4 प्रत्येकी, बल्लारपूर, भंडारा, गोंदिया, लाखंदूर, मोहाडी, पौनी, तिरोरा, तुमसर 3 प्रत्येकी, आर्णी, भद्रावती, ब्रम्हपुरी, देवरी, देसाईगंज, कुरखेडा, मोंदा राजुरा, रामटेक, उमरेड 2 प्रत्येकी, अहीरी, अमरावती, अर्जुनी मोरगाव, आर्वी, भामरागड, भिवापूर, चांदूर, चिखलदरा, चिमूर, दर्यापूर, धामणगाव, धानोरा, घाटंजी, गोंडपिपरी, हिंगणा, कांपटी मूर्तिजापूर, नागभिर, नेर, पेरशिवनी, सडकअर्जुनी, सिरोंचा, वरोरा, वरुड, झारीझमनी 1 प्रत्येकी.

घाटमाथा : कोयना (पोफळी) 4, कोयना (नवजा) 3, ताम्हिणी ७, लोणावळा (टाटा), लोणावळा (ऑफिस), शिरगाव, वळवण, अम्बोणे, दावडी, इुंगरवाडी, खोपोली, ताम्हिणी 1 प्रत्येकी.

# पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा

कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार तर  तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता आहे.

मुंबई – पुण्यात मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. मुंबईत आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतील, अशी शक्यता पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.