Weather Report : पुणे व मुंबईत मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – पुणे आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जना व विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबईत आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान :

कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोंकण गोवा व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: सांगे 12, केप 9, कानकोना, मडगाव 7 प्रत्येकी, म्हापसा 6, कुडाळ, पेडेणे, वाल्पोई 5 प्रत्येकी, दोडा मार्ग, कणकवली, पणजी (गोवा) 4 प्रत्येकी, दाभोलीम (गोवा), गुहागर, हरनाई, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर देवरूख , तलासरी 3 प्रत्येकी, अंबरनाथ, चिपळूण, देवगड, महाड, माथेरान, राजापूर, वैभववाडी 2 प्रत्येकी, भिरा, कल्याण, खेड, मार्मगोवा, पनवेल, सावंतवाडी, श्रीवर्धन, सुधागड पाली, ठाणे, उल्हासनगर, वाडा 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : शेवगाव 10, अक्कलकुवा 7, चाळीसगाव, गगनबावडा, मालेगाव 5 प्रत्येकी, जेऊर, महाबळेश्वर 4 प्रत्येकी, गडहिंग्लज, पन्हाळा, पाथर्डी, पेठ, राधानगरी 3 प्रत्येकी, जाम खेड, पंढरपूर, सांगोला 2 प्रत्येकी, आजारा, बारामती, चांदगड, दिंडोरी, गिरना धरण, हर्सूल, इंदापूर, कागल, कोल्हापूर, मंगळवेढा, मुळदे, नांदगाव, नेवासा, निफाड, ओझर (नाशिक), पुणे, राहुरी, सोलापूर, सुरगाणा 1 प्रत्येकी.

मराठवाडा : पैठण, पालम 9 प्रत्येकी, मुखेड 7, गेओराई, पाथरी, रेणापूर 6 प्रत्येकी, देग्लूर, कन्नड, मानवत 5 प्रत्येकी, भूम, देवणी, घनसावंगी, पारंडा, सोनपेठ 4 प्रत्येकी, बीड, धारूर, गंगाखेड, गंगापूर, खुलताबाद, परभणी, परळी वैजनाथ, पाटोदा, सेलू, शिरूर कासार 3 प्रत्येकी, आष्टी, औरंगाबाद, औसा, बटनापूर, चाकूर, जळकोट, कैज, मंजल गाव, नायगाव खैरगाव, पूणा, शिरूर अनंतपाल, उमरगा २ प्रत्येकी, अंबड, धर्मबाद, हिंगोली, कंधार, लातूर, निलंगा, उस्मानाबाद , परतूर, उमारी, वैजापूर, वडावणी 1 प्रत्येकी.

विदर्भ : भामरागड 11, अहीरी, पुसद 3 प्रत्येकी, कोरपना 2, जिवती, सोली 1 प्रत्येकी
घाटमाथा: कोयना (पोफळी) 5, अम्बोणे 4, खोपोली 2, ताम्हिणी, कोयना( नवजा), दावडी, लोणावळा(टाटा), लोणावळा (ऑफिस), इंगरवाडी, शिरगाव 5 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज 

27 सप्टेंबर : कोंकण-गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

28 सप्टेंबर : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

29 सप्टेंबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

30 सप्टेंबर : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा 

27-28 सप्टेंबर : काही नाही.

29 सप्टेंबर : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता.

30 सप्टेंबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.