Weather Report: पुण्यात हलका तर मुंबईत मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता

Weather Report: Chance of light to moderate rain in Pune and moderate to heavy rain in Mumbai गेल्या 24 तासांत कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

एमपीसी न्यूज – दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा असून पुण्यात हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. मुंबईत आकाश सामान्यतः ढगाळ राहून मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांत कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा : कानकोन 15, दाभोलीम(गोवा), मालवण 13 प्रत्येकी, केपे, वेंगुर्ला 11 प्रत्येकी, मार्मगोवा 10, मंडणगड 9, देवगड, सांगे 7 प्रत्येकी, भिरा, कणकवली, सावंतवाडी 6 प्रत्येकी, खेड, कुडाळ, लांजा, महाड, फोंडा, राजापूर 5 प्रत्येकी, चिपळूण, दोडामार्ग, म्हापसा, रत्नागिरी, संगमेश्वर-देवरूख, वैभववाडी 4 प्रत्येकी, कर्जत, पनवेल, पेडणे, पोलादपूर, सुधागडपात्री 3 प्रत्येकी, बेलापूर(ठाणे), भिवंडी, दापोली, कल्याण, खालापूर, माणगाव, म्हसाळा, मुरुड, पेण, रोहा, श्रीवर्धन, उरण 2 प्रत्येकी, डहाणू, गुहागर, जव्हार, मुंबई(कुलाबा), शहापूर, विक्रमगड, वाडा 1 प्रत्येकी.

मध्य-महाराष्ट्ः दहीगाव 8, गगनबावडा 7, राधानगरी 5, धारणगाव, एरंडोल, महाबळेश्वर, पन्हाळा, शाहूवाडी 3 प्रत्येकी, अमळनेर, चांदगड, जळगाव, लोणावळा(कृषी), श्रीरामपूर 2 प्रत्येकी, आजरा, इगतपुरी, कोपरगाव, नंदुरबार, पाचोरा, पारोळा, राहुरी, शिराळा 1 प्रत्येकी.

मराठवाडा: पूर्णा, सोनपेठ 5 प्रत्येकी, कन्नड 4, भोकरदन, वैजापूर 3 प्रत्येकी, बीड, भूम, माजलगाव, वाशी 2 प्रत्येकी, निलंगा, सेलू, उमारी, वसमत 1 प्रत्येकी.

_MPC_DIR_MPU_II

घाटमाथा: कोयना (पोफळी), ताम्हिणी 7 प्रत्येकी, डोंगरवाडी 6, अम्बोणे, कोयना (नवजा) 5 प्रत्येकी, शिरगाव, दावडी 4 प्रत्येकी, खोपोली, लोणावळा (टाटा) 2 प्रत्येकी,
लोणावळा (ऑफिस), वाणगाव, भिवपुरी, खंद 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

19 जुलै: कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही पाऊस पडण्याची शक्यता.

20-21 जुलै: कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा :
19 जुलै : कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.