Weather Report : पुण्यात मध्यम तर मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत पुणे व आसपासच्या परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान :

कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोवा, मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खाल्रीलप्रमाणे:

कोंकण आणि गोवा: पनवेल 31, मुंबई (सांताक्रूझ) 29, ठाणे 19, वसई 18, माथेरान 16, उरण 15, वैभववाडी 13, बेलापूर (ठाणे) 12, पालघर 11, देवगड, मालवण, पेण, रोहा, श्रीवर्धन 10 प्रत्येकी, सुधागड पाल्लरी 8, कणकवली, कर्जत, कुडाळ, सावंतवाडी 7 प्रत्येकी, अलिबाग, म्हसळा, राजापूर 6 प्रत्येकी, गुहागर, खालापूर, लांजा, मुरुड, संगमेश्वर देवरुख, वालपोई 5 प्रत्येकी, डहाणू, दोडामार्ग, महाड, माणगाव, फोंडा, रामेश्वरगरी, रत्नागिरी 4 प्रत्येकी, भिवंडी , कानकोना, दाभोलीम (गोवा), हरनाई, कल्याण, सांगे, तलासरी, उल्हासनगर, विक्रमगड 3 प्रत्येकी अंबरनाथ, खेड, मंडणगड, पेडणे, केपे, वेंगुर्ला 2, चिपळूण, म्हापसा, मार्मागोवा, पोलादपूर 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: गगनबावडा 17, अकोले 9, देवळा, धारणगाव 8 प्रत्येकी, पाचोरा 7, चांदगड, धुळे, पारोळा, राधानगरी 6 प्रत्येकी., भडगाव, चांदवड, दहीगाव, जामनेर, ओझर (नाशिक), पाथर्डी 5 प्रत्येकी, एरंडोल, गारगोटी / भुदरगड, पन्हाळा, संगमनेर, यावल 4 प्रत्येका, आजारा, बोडावड, कोपरगाव, महाबळेश्वर, मुळदे, राहुरी, शहादा, येवला 3 प्रत्येकी, अमळनेर, चोपडा, दिंडोरी, कळवण, कोल्हापूर, नेवासा, शिरपूर, वडगाव मावळ 2 प्रत्येकी, हातकणंगले, कागल, माढा, मालेगाव, मुक्‍तेईनगर, पौड मुळशी, रावेर, साक्री, सतना बागलाण, शाहूवाडी, सिंदखेडा, सिन्नर 1 प्रत्येकी.

मराठवाडा: पाथरी 7, मंजलगाव, सोयेगाव, सोनपेठ, वसमत 6, धारूर 5, अंबेजोगाई औंधानागनाथ, भोकरदन, हदगाव, पूर्णा 4 प्रत्येकी, बीड, बिलोली, चाकूर, देगलूर, जाफराबाद, मानवत, मुदखेड 3 प्रत्येकी, औरंगाबाद, गंगाखेड, कळमनुरी, खुलताबाद, किनवट, लोहारा, माहूर, पालम, पाटोदा, सेलू, सिल्लोड 2 प्रत्येकी, अर्धापूर, बदनापूर, घनसावंगी, जिंतूर, लातूर, नांदेड, परभणी, फुलंब्री, रेणापूर, सेनगाव, शिरूर कासार, उमारी 1 प्रत्येकी.

विदर्भ: भंडारा, गडचिरोली, मंगळुरपीर, पर्सेओनी, वर्धा 5 प्रत्येकी, मौदा, साओली, सावनेर 4 प्रत्येकी, आर्वी, आष्टी, चांदूर बाजार, गोरेगाव, लाखनी, परतवाडा, रामटेक, सिरोंचा, उमरखेड 3 प्रत्येकी, अहीरी, आमगाव, अंजनगाव, बल्लारपूर, बाटकुली , भद्रावती, देवरी, धामणगाव, धारणी, घाटंजी, गोंदिया, जळगाव जामोद, कळमेश्वर, कारंजा लाड, महागाव, मनोरा, मोर्सी, नेर, पुसद, सेलू, तिरोरा, वाशिम 2 प्रत्येकी, अकोला, अकोट, आरमोरी, बाळापूर, चंद्रपूर , चांदूर, दारव्हा, दर्यापूर, धानोरा, एटापल्ली, कुरखेडा, मलकापूर, मेहकर, मोताळा, मुल, मुल चेरा, नंदुरा, नरखेडा, पंढरीकावडा, राजुरा, सडक अर्जुनी, साकोली, सालेकसा, संग्रामपूर, शिंदेवाहि, तेलहारा, ट्यूवासा, तुमसर 1 प्रत्येकी

घाटमाथा: डुंगरवाडी 9, शिरगाव, ताम्हिणी, खोपोली 7 प्रत्येकी, दावडी, अम्बोणे 6 प्रत्येकी, भिवपुरी, कोयना (पोपळी), लोणावळा(टाटा) 4 प्रत्येकी, शिरोटा, लोणावळा(ऑफिस) 3 प्रत्येकी, वाळवण, खंद 2 प्रत्येकी, वाणगाव, कोयना ( नवजा) 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

23-24 सप्टेंबर: कोंकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

25 सप्टेंबर: कोंकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

26 सप्टेंबर: कोंकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी; विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

27 सप्टेंबर: कोंकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा:

24 सप्टेंबर: कोकण – गोवा मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसाची शक्यता.

25 सप्टेंबर: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसाची शक्यता.

26-27 सप्टेंबर: काही नाही

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.