-MPC-TOP-MOST-BANNER-I

Weather Report : पुणे परिसरात आज सायंकाळी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पुणे आणि आसपासच्या परिसरात मागील 24 तासांत जोरदार पावसाची नोंद झाली. आज (शनिवारी) पाषण परिसरात 46.4 एमएम, लोहगाव 43 एमएम आणि शिवाजीनगरमध्ये 38.7 एमएम पावसाची नोंद झाली. आज सायंकाळी पुणे आणि आसपासच्या परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पुणे वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, पुणे व आसपासच्या परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची, तर घाट विभागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुण्यात शनिवारी कमाल तापमान 29 अंश सेल्सियस तर किमान 22 अंश असेल.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn