Weather Report: कोकण, गोवा व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा शक्यता

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत (शुक्रवारी) कोकण गोवा व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. पुणे शहर व परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर मुंबई व उपनगरांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: राजापूर 11, केपे 9, अलिबाग, देवगड 5 प्रत्येकी, गुहागर, लांजा, मडगाव, मुरुड, पेण, पोलादपूर, फोंडा, सांगे, सुधागड पाली 4 प्रत्येकी, भिरा, कणकवली, पेडणे, संगमेश्वर देवरुख, उरण, वेंगुली 3 प्रत्येकी, कानकोन, दापोली, मालवण, मुंबई (कुलाबा), रामेश्वरी, रत्नागिरी, सावंतवाडी 2 प्रत्येकी, अंबरनाथ, डहाणू, कल्याण, महाड, पणजी (गोवा), उल्हासनगर, वैभववाडी, वडा 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: चाळीसगाव 8, जामनेर, पंढरपूर 7 प्रत्येकी, अमळनेर, लोणावळा (कृषी), शिरपूर, श्रीरामपूर 6 प्रत्येकी, चांदवड, पारोळा, सिंध-खेडा 5 प्रत्येकी, पाचोरा 4, बार्शी, नांदगाव, शहादा 3 प्रत्येकी, धारणगाव, धुळे, एरंडोल, गगनबावडा, मंगलवेढा, राहाता, येवला 2 प्रत्येकी, आजारा, भडगाव, भोर, देवळा, माढा, मालेगाव, मिरज, मोहोळ, मुळदे, निफाड, पारनेर, रावेर, संगमनेर, सांगोला, सटाणा 1 प्रत्येकी.

मराठवाडा: खुलताबाद 10, पाथरी 7, बदनापूर, सोयेगाव 5 प्रत्येकी, कन्नड 4, गंगापूर, घनसावंगी, नायगाव खैरगाव, पालम, फुलंब्री 3 प्रत्येकी, जालना, परतूर 2 प्रत्येकी, बीड, गेवराई, हिंगोली, जाफराबाद, जिंतूर, केज, कंधार, उस्मानाबाद, सेनगाव, शिरूर कासार, वैजापूर 1 प्रत्येकी.
विदर्भ: अकोट, मंगळुरपीर, वाशिम 3 प्रत्येकी, अकोला, चिखली, देऊळगाव राजा, मालेगाव, मलकापूर, मेहकर, मोताळा, नंदुरा, सिंधखेड राजा, वरुड 2 प्रत्येकी, अंजनगाव, आष्टी, बाळापूर, बुल़़डाणा, दर्यापूर, जळगाव जामोद, खामगाव, मानोरा, नरखेडा, पातूर, रिसोड, संग्रामपूर, शेगाव 1 प्रत्येकी.

घाटमाथा: डुंगरवाडी, लोणावळा(ऑफिस) 6 प्रत्येकी, लोणावळा(टाटा), भिवपुरी 4 प्रत्येकी, खोपोली, ताम्हिणी 3 प्रत्येकी, शिरोता, वळवण, कोयना (पोफळी), कोयना (नवजा) 1 प्रत्येकी.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव: तुलसी 6, मध्य वैतरणा 3, वैतरणा 2, विहार, अप्पर वैतरणा 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

31 जुलै : कोकण गोवा व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी,मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
01 ऑगस्ट: कोकण गोवा व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
2-3 ऑगस्ट: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचीशक्यता

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.