Weather Report : येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र व कोकणात काही ठिकाणी पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – मागील दोन दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी आकाश ढगाळ आहे. येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र व कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

_MPC_DIR_MPU_II

मागील 24 तासांत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला तर, मराठवाड्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतांश भागात तर विदर्भाच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्यात किंचित वाढ झाली आहे तर, उर्वरित राज्यात तापमान सरासरीच्या जवळपास होते.

पुण्यात आकाश मुख्यत: ढगाळ राहण्याची शक्यता असून तुरळक पावसाची शक्यता आहे. मुंबईत आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.