Weather Report : विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त).

कोकण आणि गोवा : माथेरान 2, अंबरनाथ, भिरा, चिपळूण, गुहागर, हरनाई, जव्हार, कल्याण, कर्जत, कुडाळ, मंडणगड, म्हापसा, मुंबई (कुलाबा), पनवेल, पेण, रोहा,
सुधागड पाली, ठाणे, उल्हासनगर 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : अमळनेर 6, लोणावळा (कृषी) 2, अक्कलकुवा, धरणगाव, इगतपुरी, जळगाव, पन्हाळा, शिराळा 1 प्रत्येकी.

विदर्भ: सिरोंचा 2, एटापल्ली 1

घाटमाथा : कोयना (नवजा), अम्बोणे 3, डोंगरवाडी, दावडी, शिरगाव, लोणावळा(टाटा), लोणावळा(ऑफिस) 2 प्रत्येकी, ताम्हिणी, खंद, खोपोली, वळवण, शिरोटा 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

26-27 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

28 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

29 ऑगस्ट : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

30 ऑगस्ट : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

इशारा:

27 ऑगस्ट : विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

28 ऑगस्ट : विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

29 ऑगस्ट : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

पुणे आणि आसपासच्या परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.