Weather Report : कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोंकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात हवामान कोरडे होते.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेत्रेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: पेण 7, हरनाई, मुंबई (सांताक्रूझ) 6 प्रत्येकी, दोडामार्ग, मालवण, ठाणे 5 प्रत्येकी, देवगड, कुडाळ 4 प्रत्येकी, कानकोन, कल्याण, रोहा, सुधागड पाली, उल्हासनगर 3 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), माथेरान, पनवेल, पोलादपूर 2 प्रत्येकी, खालापूर, उरण, वैभववाडी, वाडा 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: वडगाव मावळ 3, तासगाव 2, खेड राजगुरूनगर, ओझर (नाशिक), पुणे (लोहगाव), वाळवा इस्लामपूर 1 प्रत्येकी.

घाटमाथा: काही नाही.

पुढील हवामानाचा अंदाज:

05 ऑक्टोबर: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मराठवहा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता.

06-07 ऑक्टोबर: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता.

08 ऑक्टोबर: विदर्भात काही ठिकाणी तर कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता. मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता.

इशारा:

05 ऑक्टोबर: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

06-07 ऑक्टोबर: काही नाही.

08 ऑक्टोबर: विदर्भात तुरळक ठिकाणी ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.