Weather Report : कोंकण- गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्‍यता

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत कोंकण- गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोंकण गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:
कोकण आणि गोवा: संगमेश्वर देवरुख 7, राजापूर 6 महाड, पोलादपूर 5 प्रत्येकी, म्हसळा, वैभववाडी, वैगुर्ला 4 प्रत्येकी, लांजा, मालवण, मंडणगड, मुरुड 3 प्रत्येकी, देवगड, पेण, श्रीवर्धन 2 प्रत्येकी, मुंबई (कुलाबा), सांगे, सावंतवाडी 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: पाटण, पौड मुळशी 4 प्रत्येकी, कवठे महाकाळ, सातारा, सोलापूर 3 प्रत्येकी, कडेगाव, शिरूर घोडनाडी, तासगाव 2 प्रत्येकी, अक्कलकोट, जावळी मेधा, कराड, पुणे (पाषाण), शेवगाव, वडगाव मावळ, वाई प्रत्येकी.

मराठवाडा: किनवट 1

पुढील हवामानाचा अंदाज:
27 ऑक्टोबर: कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता.

28-30 ऑक्टोबर: गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता.

इशारा:
26 ऑक्टोबर: कोंकण- गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता.

27-30 ऑक्टोबर: काही नाही.

विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.