Weather Report : गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, दक्षिण कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, कोकण गोवा, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: भिरा, मुरुड 2 प्रत्येकी, रोहा 1 पालघर 2, मोखेडा 1

मध्य महाराष्ट्र: मोहोळ 3, हर्सूल, कळवण, माळशिरस 2, बारामती, माढा, मुळदे, ओझरखेडा, पेठ, पुणे, सातारा, शिराळा, सोलापूर, विटा 1 प्रत्येकी.

विदर्भ: दिग्रस, घाटंजी, नांदगाव काजी, पंढरीकावडा 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज 

21 ऑक्टोबर: कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

22 ऑक्टोबर: कोंकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

23 ऑक्टोबर: कोंकण गोव्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता.

24 ऑक्टोबर: कोंकण गोव्यात काही ठिकाणी पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता.

इशारा 

21 ऑक्टोबर: दक्षिण कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

22 ऑक्टोबर: कोंकण- गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता.

23-24 ऑक्टोबर: काही नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.