Weather Report : गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्‍यता

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान :
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी, कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

मध्य महाराष्ट्र : सतना बागलाण 18, देवळा 8, सुरगाणा 3, जळगाव, कळवण 2 प्रत्येकी, खेड राजगुरूनगर, मुळदे, पुणे 1 प्रत्येकी.

मराठवाडा : हिमायतनगर, निलंगा 3 प्रत्येकी, हदगाव 2, हिंगोली, कळमनुरी, किनवट, माहूर 1 प्रत्येकी.

विदर्भ : पुसद 6, मालेगाव 5, नांदगाव काजी 4 प्रत्येकी, लोणार 3, भामरागड, रिसोड, वाशिम 2 प्रत्येकी, अहीरी, आर्णी, दिग्रस, महागाव 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज :

19 ऑक्टोबर : मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी; कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

20 ऑक्टोबर : कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

21 ऑक्टोबर : कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

22 ऑक्टोबर : कोंकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

इशारा:

19-21 ऑक्टोबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता.

22 ऑक्टोबर : कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

पुणे आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.