Weather Report : कोंकण- गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्‍यता

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत कोंकण- गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: खालापूर 9, माथेरान 8, कर्जत 7, वडा 4, अंबरनाथ, पनवेल, शहापूर, सुधागड पाली, उल्हासनगर 2 प्रत्येकी, जव्हार, कल्याण, मोखेडा, पेण, वसई 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: जुन्नर 6, कर्जत 5, रहाटा, श्रीरामपूर, सिन्नर 4 प्रत्येकी, जाम खेड, कोपरगाव, वडगाव 1 प्रत्येकी.

मराठवाडा: औरंगाबाद 4, भूम, परळी वैजनाथ 3 प्रत्येकी, गंगाखेड, मनवत, परभणी, पाथरी, सेलू, सेनगाव 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

23-24 ऑक्टोबर: कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता.

25-26 ऑक्टोबर: गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता.

27 ऑक्टोबर: गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता.

इशारा:

24-25 ऑक्टोबर: कोंकण- गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता.

26-27 ऑक्टोबर: काही नाही.

पुणे आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे तर मुंबई शहर व उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.