Weather Report : मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : विदर्भात काही ठिकाणी तर कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

मध्य महाराष्ट्र : इंदापूर 3, आटपाडी, कोरेगाव, श्रीगोंदा 1 प्रत्येकी.

विदर्भ : गडचिरोली, तिवसा 3 प्रत्येकी, अहीरी, भामरागड, पोंभुर्णा 2 प्रत्येकी, आमगाव, आर्मोरी, ब्रम्हपुरी, चामोर्शी, इटापल्ली, गोंदिया, मारेगाव, मुलचेरा, नागपूर, वर्धा 1 प्रत्येकी.

घाटमाथा : भिवपुरी 3, खंद 1

पुढील हवामानाचा अंदाज :

01-02 ऑक्टोबर गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

03-04 ऑक्टोबर: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता . विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता.

इशारा :

01 ऑक्टोबर: मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

02-04 ऑक्टोबर: काही नाही.

पुण्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता आहे. तर मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.