Weather Report : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला .

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला . कोकण गोवा बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा : तलासरी 8, भिरा, माथेरान, पनवेल, उल्हासनगर, विक्रमगड 7 प्रत्येकी, अंबरनाथ, भिवंडी, जावर, लांजा, मोखेडा एफएमओ, मुंबई (सांताक्रूझ), ठाणे 5 प्रत्येकी , बेलापूर (ठाणे), डहाणू, कर्जत, महाड, मंडणगड, पालघर, पेण, संगमेश्वर देवरूख, शहापूर, सुधागड पाली 4 प्रत्येकी, कानकोन, कल्याण, कणकवली, खालापूर, माणगाव, म्हसळा, पेडणे, पोलादपूर, उरण, वाडा 3 प्रत्येकी , अलिबाग, खेड, कुडाळ, मालवण, फोंडा, राजापूर, रोहा, सावंतवाडी, श्रीवर्धन, वैभववाडी 2 प्रत्येकी, चिपळूण, देवगड, दोडा मार्ग, गुहागर, हर्णे, मडगाव, मार्मगोवा पीएमओ, मुरबाड, मुरुड, केपे, रत्नागिरी, सांगे, वसई 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : इगतपुरी, महाबळेश्वर 7 प्रत्येकी, पेठ 5, गगनबावडा, हर्सून एफएमओ, लोणावळा (कृषी), वेल्हे 4 प्रत्येकी, ओझरखेडा एफएमओ, पन्हाळा, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर 3 प्रत्येकी, अक्कलकुवा, चांदगड, जावळीमेधा, पौड मुळशी 2 प्रत्येकी, आजरा, खेड राजगुरूनगर, मुळदे, नवापूर, निफाड, ओझर (नाशिक एपी), राधानगरी, तळोदा, वडगाव मावळ, मराठवाडा प्रत्येकी.

घाटमाथा: दावडी 11, शिरगाव 9, इंगरवाडी, अम्बोणे 8, कोयना(नवजा), खोपोली 5, लोणावळा(टाटा), लोणावळा(ऑफिस) 4 प्रत्येकी, शिरोटा, वळवण, कोयना(पोफळी) 3 प्रत्येकी, ठाकूरवाडी, वाणगाव 2 प्रत्येकी, भिवपुरी 3, खंद 2, ताम्हिणी 1.

पुढील हवामानाचा अंदाज:

01 सप्टेंबर : कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

02 सप्टेंबर : कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

03 सप्टेंबर : कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

04 सप्टेंबर : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा:

02 सप्टेंबर : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता.

03 सप्टेंबर : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता.

04 सप्टेंबर : कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

पुणे व मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.