Weather Report : कोंकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत कोंकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा : कोणकोण 1

मध्य महाराष्ट्र: देवला, माढा 2 प्रत्येकी.

मराठवाडा: अर्धापूर, नांदेड 5 प्रत्येकी, पूर्णा 2 गेवराई, पालम 1 प्रत्येकी.

विदर्भ: मलकापूर 1

पुढील हवामानाचा अंदाज:

03-04 ऑक्टोबर: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता‌. विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता.

05 ऑक्टोंबर : कोकण गोव्यात काही ठिकाणी तर व मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता . मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता.

06 ऑक्टोंबर : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता. मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता.

इशारा :

02-04 ऑक्टोंबर : कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

05 ऑक्टोंबर : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

06 ऑक्टोबर: विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

पुणे परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता. मुंबई शहर व उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.