Weather Report: कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमीमध्ये) 1 सेंमीपेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा: भिरा 3, खालापूर 2, कर्जत, कुडाळ, वैभववाडी 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : चाळीसगाव, धुळे, राहाता, शिरूर घोडनदी 3 प्रत्येकी, चोपडा, नांदगाव, पारनेर, पौड मुळशी, पुणे 2 प्रत्येकी, दहिगाव, गिरना धरण एफएमओ, जामनेर, कडेगाव, कळवण, कोपरगाव, ओझर (नाशिक एपी), वाई, वळवा इस्लामपूर 1 प्रत्येकी.

विदर्भ : गडचिरोली, हिंगणा 3 प्रत्येकी, आर्वी, देऊळगाव राजा, धानोरा 2 प्रत्येकी, आरमोरी, बुलढाणा, एटापल्ली, घाटंजी, कारंजा लाड, कुही, नरखेडा, उमरेड, वरुड 1 प्रत्येकी.

घाटमाथा : इंगरवाडी 2, शिरगाव, वाणगाव, अम्बोणे, खोपोली, ताम्हिणी 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज :

07-08 सप्टेंबर: कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

09 सप्टेंबर : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

10 सप्टेंबर : कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा :

07 सप्टेंबर : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

08 सप्टेंबर : काही नाही.

09-10 सप्टेंबर : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

पुणे आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.