Weather Report : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. तर गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा : माथेरान 5, डहाणू, कल्याण, कर्जत, मंडणगड, म्हसळा, शहापूर, तलासरी, उरण, वाडा 3 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), जव्हार, खालापूर, मोखेडा, पेन, श्रीवर्धन, सुधागड पाली, ठाणे, विक्रमगड 2 प्रत्येकी , अलिबाग, अंबरनाथ, कणकवली, खेड, कुडाळ, महाड, मालवण, मुंबई (सांताक्रूझ), मुरुड, पालघर, पणजी (गोवा), पनवेल, पेडणे, पोलादपूर, राजापूर, रामेश्वर (कृषी), रोहा, उल्हासनगर, वसई 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : इगतपुरी 7, पेठ 4, लोणावळा (कृषी) 3, गगनबावडा, हर्सूल, महाबळेश्वर, ओझरखेडा 2 प्रत्येकी, अमळनेर, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, वडगाव मावळ, वेल्हे 1 प्रत्येकी.

घाटमाथा: खोपोली 5, कोयना(नवजा), दावडी, अम्बोणे, वळवण, शिरगाव 4 प्रत्येकी, लोणावळा(टाटा), भिवपुरी 3 प्रत्येकी, ताम्हिणी, खंद, डुंगरवाडी, शिरोटा, लोणावळा(ऑफिस) 2 प्रत्येकी, कोयना(पोफळी), वाणगाव, ठाकरवाडी 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

02 सप्टेंबर: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

03 सप्टेंबर: गोव्यासह संपूर्ण राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

04 सप्टेंबर: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

05 सप्टेंबर: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा:

02 सप्टेंबर : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता

03 सप्टेंबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता.

04-05 सप्टेंबर: कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनजा व विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.