Weather Report : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : विदर्भात काही ठिकाणी तर कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात हवामान कोरडे होते.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे

मध्य महाराष्ट्र : इगतपुरी 1

विदर्भ : नागपूर 2, हिंगणा, तिवसा 1 प्रत्येकी.

घाटमाथा : अम्बोणे, ताम्हिणी 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

30 ऑक्टोंबर : मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण गोवा, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

01-02 ऑक्टोबर: कोकण गोवा काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

03 ऑक्टोबर: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता.

इशारा :

29 सप्टेंबर : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

30 सप्टेंबर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

01-03 ऑक्टोबर: काही नाही.

पुण्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.