Weather Report : दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान:  कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे 

कोकण आणि गोवा: संगमेश्वर, देवरूख 3 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), डोडामार्ग, गुहागर, सांगे 2 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र :  शिरोळ 3, गगनबावडा, कराड 1 प्रत्येकी.

मराठवाडा : औंधा नागनाथ 1

विदर्भ : देसाईगंज, गडचिरोली, पोनी 1 प्रत्येकी.

घाटमाथा : अम्बोणे 3, शिरगाव, इुंगरवाडी, कोयना (नवजा) 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज :

28-30 सप्टेंबर: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

01-02 ऑक्टोबर: कोकण गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा : 

29 सप्टेंबर: दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

30 सप्टेंबर दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

01-02 ऑक्टोबर: काही नाही.

पुणे आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.