Weather Report: गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता

Weather Report: Chance of torrential rain in sparse places across the state including Goa राज्यात सातारामध्ये वादळी तर कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, धुळे, नगर, नाशिक, नंदुरबार या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज- नैऋत्य मौसमी वाऱ्याने देश व्यापला असताना राज्यात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मागील 24 तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण गोवा, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला आहे.

पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सातारामध्ये वादळी तर कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, धुळे, नगर, नाशिक, नंदुरबार या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात नोंदवला गेल्रेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमीपेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: पेन 5, बेलापूर (ठाणे), ठाणे 4 प्रत्येकी, हर्णे, म्हसळा, मुंबई (सांताक्रूझ), मुरुड 3 प्रत्येकी, अलिबाग, भिवंडी, चिपळूण, वैभववाडी 2 प्रत्येकी, कुडाळ, राजापूर, रामेश्वर कृषी, संगमेश्वर देवरूख 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: लोणावळा (कृषी) 15, गगनबावडा, पाथर्डी 6 प्रत्येकी , धुळे, गिरना धरण, सोलापूर 5 प्रत्येकी, दौंड, कर्जत, राहुरी, शेवगाव 4 प्रत्येकी, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, दहिवडी माण, देवळा, गडहिंग्लज, कोपरगाव, नंदगाव, पारनेर शाहदा, त्र्यंबकेश्‍वर 3 प्रत्येकी, मंगळवेढा, रहाता 2 प्रत्येकी, जाट, करमाळा, मालेगाव, ओझर (नाशिक), श्रीगोंदा, येवला १ प्रत्येकी.

मराठवाडा: पूर्णा 6, अंबड, बदनापूर, अहमदपूर, औसा, माहूर, मंथा, नायगाव खैरगाव, निलंगा, परतूर, शिरूर कासार, वडावणी 4 प्रत्येकी, जिंतूर, खुलताबाद, किनवट, पैठण, पालम, रेणापूर, सेनगाव 3 प्रत्येकी, अंबेजोगाई, औरंगाबाद, बिलोली, गंगाखेड, जिओराई, घनसावंगी, कळमनुरी 2 प्रत्येकी, आष्टी, औंधा नागनाथ, हिंगोली, कंधार, लोहा, मंजल गाव, मुखेड, पाथरी, सोनपेठ 1 प्रत्येकी.

विदर्भ: चिमूर 5, महागाव, मालेगाव 4 प्रत्येकी, पुसद, रिसोड, साओली, वाशिम 3 प्रत्येकी, भद्रावती, देसाईगंज, घाटंजी, कुरखेडा, मंगळूरपीर, मानोरा, वरोरा 2 प्रत्येकी, बाळापूर, ब्रम्हपुरी, धानोरा, दिग्रस, खामगाव, लोणार, मेहकर, मोताळा मुल, नेर, संग्रामपूर, सिंधखेड राजा, उमर खेड, यवतमाळ ? प्रत्येकी.

घाटमाथा: लोणावळा (टाटा) 17, लोणावळा (ऑफिस) 12, कोयना (पोफळी) 8, वळवण 4, अम्बोणे 3, शिरोटा 1.

पुढील हवामानाचा अंदाज

28 जून: कोकण गोवा व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

29 जून- 1 जुलै: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

02 जुलै: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा

28 जून: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

29 जून: गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता.

30 जून: कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता.

1 जुलै: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

2 जुलै: कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.