Weather Report : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Chance of torrential rain in sparse places in Central Maharashtra पुण्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊसाची शक्यता

एमपीसी न्यूज –  दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत असलेलला कमी दाबाचा पट्टा आता पूर्वमध्य अरबी समुद्र, कर्नाटक – लक्षद्वीप किनारपट्टीलगत आहे.  कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.

गेल्या 24 तासांत कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण-गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊसाची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा : मुंबई (सांताक्रूझ) 15, वसई 12, मालवण, सावंतवाडी 11 प्रत्येकी, रामेश्वरी 10, कानाकोना, देवगड, म्हापसा, वैभववाडी 8 प्रत्येकी, अलिबाग, गुहागर, कणकवली, पेण, राजापूर 7 प्रत्येकी, दापोली, खेड, केपे, ठाणे 6 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), दोडामार्ग, खालापूर, कुडाळ, मडगाव, मुळदे, मुरुड, पणजी (गोवा), रत्नागिरी, संगमेश्वर देवरुख, सांगे, उरण 5 प्रत्येकी, दाभोलीम (गोवा), हरनाई, मंडणगड, मार्मगोवा, माथेरान, पेडणे , फोंडा, रोहा, श्रीवर्धन, वाल्पोई, वेंगुर्ला 4 प्रत्येकी, भिरा, चिपळूण, लांजा, महाड, म्हसळा 3 प्रत्येकी, माणगाव, पनवेल, पोलादपूर, सुधागड पाली 2 प्रत्येकी, भिवंडी, कल्याण, कर्जत, पालघर, शहापूर 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : राधानगरी 11 , गगनबावडा 9, अकोले, जळगाव 4 प्रत्येकी, आजारा, कोल्हापूर, महाबळेश्वर, पन्हाळा, शिरपूर 3 प्रत्येकी, चाळीसगाव, गडहिंग्लज, कागल, लोणावाळा (कृषी), सांगली, शाहुवाडी, श्रीरामपूर 2 प्रत्येकी, अमळनेर, भडगाव, चंदगड , धारणगाव, एरंडोल, गारगोटी, हातकणंगले, कवठे महाकाळ, मिरज, पलूस, रावेर, शिराळा, शिरोळ, तासगाव, वेल्हे, विटा, वाई, वाळवा इस्लामपूर, येवला 1 प्रत्येकी.

मराठवाडा : सिल्लोड 6, हिंगोली, जाफराबाद, जालना 4 प्रत्येकी, गंगाखेड, कळमनुरी, सोयगाव 3 प्रत्येकी, औरंगाबाद, भोकरदन, जिंतूर, कंधार, लोहा, सेनगाव, सोनपेठ 2  प्रत्येकी, अंबड, औंधा नागनाथ, गंगापूर, कन्नड, माहूर, मंथा, नायगाव खैरगाव , परतूर, वैजापूर 1 प्रत्येकी.

विदर्भ : मंगळुरपीर 4, गोरेगाव, तिवसा 3 प्रत्येकी, अमरावती, आर्वी, भामरागड, चिखलदरा, दर्यापूर, धारणी, गोंड पिपरी, कळमेश्वर, मानोरा, मारेगाव, मोहाडी, मुल, संग्रामपूर, वाशिम 2 प्रत्येकी, अहीरी, अकोला, आष्टी, बल्लारपूर, भद्रावती, चामोर्शी , चांदूर, दारव्हा, हिंगणा, जळगाव जामोद, कामठी, काटोल, लोणार, मालेगाव, मुलचेरा, नरखेडा, पारशिवनी, पुसद, राजुरा, रिसोड, साओली, सिंधखेड राजा, सिरोंचा, तिरोरा, वणी, वर्धा 1 प्रत्येकी.

घाटमाथा : कोयना (नवजा) 10, ताम्हिणी, अम्बोणे 5 प्रत्येकी, डुंगगरवाडी, दावडी, शिरगाव  4 प्रत्येकी, लोणावळा (ऑफिस), लोणावळा (टाटा), कोयना (पोफळी) 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

17-18 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

19-20 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

21 जुलै : कोंकण गोवा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा :

17 जुलै : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

18-19 जुलै : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

पुण्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊसाची शक्यता. तर मुंबईत आकाश सामान्यत: ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊसाची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.