Weather Report : मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्‍यता

एमपीसी न्यूज – राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी पडल्या आहेत. उत्तर महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याची माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे. 

गेल्या 24 तासांत कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) ( 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे

कोकण आणि गोवा : गुहागर 15, कुडाळ 12, रत्नागिरी 11, मुंबई (कुलाबा) 10, चिपळूण, डोडामार्ग, मालवण 8 प्रत्येकी, म्हापसा, मुरुड 7 प्रत्येकी, उरण, वाल्पोई 6 प्रत्येकी , हर्णे, राजापूर, सावंतवाडी, वेंगुर्ला 5 प्रत्येकी, देवगड, कणकवली, पेडणे, श्रीवर्धन, वैभववाडी 4 प्रत्येकी, भिवंडी, कल्याण, संगमेश्वर-देवरुख 3 प्रत्येकी, खेड, लांजा, पणजी (गोवा), सांगे 2 प्रत्येकी, अलिबाग, बेलापूर (ठाणे), कानकोन, डहाणू, मडगाव, मोखेडा, मार्मगोवा 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : विटा 11, दौंड, माल्रेगाव बागलाण 7 प्रत्येकी, गगनबावडा, त्र्यंबकेश्वर 6 प्रत्येकी, करमाळा, खेड राजगुरूनगर, ओझर (नाशिक एपी), पुणे, शाहूवाडी 5 प्रत्येकी, कळवण, तळोदा 4 प्रत्येकी, चाळीसगाव, कोरेगाव, मिरज, मुक्‍ताईनगर / ए दलाबाद, पुरंदर सासवड, सिन्नर, सुरगणा, तासगाव, येवला 5 प्रत्येकी, देवळा, धाडगाव, दिंडोरी, इंदापूर, जुन्नर, माधा, मंगळवेढा, मोहोळ, नांदगाव, पंढरपूर, पेठ, साक्री, वाई २ प्रत्येकी, चांदवड, गडहिंग्लज, इगतपुरी, जामनेर, जेऊर, कवठे महाकाळ, मुळदे, नवापूर, निफाड, ओझरखेडा 1 प्रत्येकी.

मराठवाडा : अंबड 10, आष्टी, केज, वाशी 6 प्रत्येकी, अंबेजोगाई / मोमीनबाद , भूम, घनसावंगी, हिंगोली, लोहा, परतूर 4 प्रत्येकी, औरंगाबाद, औसा, जाफराबाद, पैठण, सेनगाव, सोयेगाव 3प्रत्येकी, बदनापूर, बिलोली, कळंब, कन्नड, खुलताबाद, वैजापूर 2 प्रत्येकी, धर्मबाद, धारूर, गंगापूर, कळमनुरी, मंथा, निलंगा, परळी वैजनाथ , पाटोदा, फुलंब्री, शिरूर अनंतपाल , सिल्लोड, तुळजापूर 1 प्रत्येकी.

विदर्भ : नांदगाव काजी 5 प्रत्येकी, देऊळगाव राजा, लाखंदूर, मनोरा, वरोरा 4 प्रत्येकी, बुलढाणा, चांदूर बाजार, चिखली, देसाईगंज, सिंधखेडराजा 3 प्रत्येकी, भिवापूर, ब्रम्हपुरी, चिमूर, हिंगणा, लोणार, मलकापूर, नांदुरा, पौनी, पुसद, संग्रामपूर, शेगाव, वाशिम 2 प्रत्येकी, बाळापूर, भामरागड, भंडारा, चामोर्शी, चिखलदरा, जळगाव जामोद, कोरची, मंगळुरपीर, मारेगाव, मौदा, मोहाडी, मोताळा, राळेगाव, रिसोद, सात्रेकसा, सावनेर, शिंदेवाही, तेलहरा 1 प्रत्येकी.

घाटमाथा : धारावी 9, ताम्हिणी 7, डुंगरवाडी, दावडी, भिरा 3 प्रत्येकी, शिरगाव, कोयना (पोफळी) 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज

30 जून – 2 जुलै : कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

3 जुलै – 4 जुलै : गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

इशारा 

30 जून – 1 जुलै : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. महाराष्ट्र व गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

2 जुलै : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍्यता.

3 जुलै – 4 जुलै : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍्यता.

पुण्यात मेघ गर्जना व विजांच्या कडकडासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबई मध्ये आकाश सामान्यतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.