Weather Report : मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता

महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

एमपीसी न्यूज – राज्यात येत्या 24 तासांत मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. 

गेल्या 24 तासांतील कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा: भिरा, खालापूर 8 प्रत्येकी, भिवंडी, चिपळूण, लांजा, मंडणगड, माथेरान, पोलादपूर, सावंतवाडी, वाडा 7 प्रत्येकी, दोडा मार्ग, ठाणे, विक्रमगड 6 प्रत्येकी, अंबरनाथ, कल्याण, कर्जत, खेड, कुडाळ, महाड, मालवण, माणगाव, म्हसळा, मोखेडा, केपे, संगमेश्वर देवरूख , शहापूर, उल्हासनगर 5 प्रत्येकी , बेलापूर (ठाणे) , डहाणू, म्हापसा, पेन, रोहा, तलासरी, वैभववाडी, वसई,, कणकवली, मुंबई (सांताक्रूझ), पनवेल , पेडणे, राजापूर, श्रीवर्धन, सुधागड, पाली 3 प्रत्येकी, अलिबाग, कानकोना, देवगड, गुहागर, हर्णै, रामेश्वरी, रत्नागिरी, उरण 2 प्रत्येकी, मडगाव, मुरबाड, मुरुड, वेंगुर्ला 1 प्रत्येकी

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा 11, इगतपुरी 7, लोणावाळा (कृषी), महाबळेश्वर, राधानगरी 6 प्रत्येकी, आजरा 5, नवापूर, शाहूवाडी 4, चांदगड, नंदुरबार, ओझरखेडा, पन्हाळा, पेठ, सुरगना, वेल्हे 3, अकोले, बोदवड, गारगोटी / भुदरगड, हातकणंगले, जळगाव, जाट, केडगाव, नांदगाव, पारोळा, पाटण, पौड मुळशी, साक्री, सातारा, तळोदा, त्र्यंबकेश्वर 1 प्रत्येकी,

मराठवाडा : जाफराबाद, फुलंब्री, सिल्लोड 1 प्रत्येकी

विदर्भ : मुलचेरा 5, धानोरा, कोरची 3, चार्मोशी, एटापल्ली, गोंदिया, शिंदेवाही 2 प्रत्येकी , अहीरी, भामरागड, गडचिरोली, गोंड पिपरी, गोरेगाव, मलकापूर, मोहाडी, मुल, नंदुरा 1 प्रत्येकी

घाटमाथा : ताम्हिणी 9, शिरगाव, अम्बोणे, कोयना (नवजा), 7 प्रत्येकी, लोणावळा(टाटा), दावडी 6 प्रत्येकी, लोणावळा(ऑफिस), कोयना(पोफळी) 5 प्रत्येकी, वळवण, डोंगरवाडी 4 प्रत्येकी, ठाकूरवाडी, वाणगाव, खोपोली, खंद, भिवपुरी 3 प्रत्येकी, शिरोटा 2 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

13-14 ऑगस्ट : कोकण गोवा बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

15-16 ऑगस्ट: कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा:

13 ऑगस्ट : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्‍यता.  महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

14 ऑगस्ट : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

15 ऑगस्ट : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

16 ऑगस्ट : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात,   मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

पुणे आणि आसपासच्या परिसरात मध्यम तर घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून मध्यम तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.