Weather Report : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Weather Report: Chance of torrential rain in sparse places in Central Maharashtra, Marathwada and Vidarbha पुण्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता तर मुंबईत आकाश सामान्यत: ढगाळ राहून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा असून  मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार तर कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

गेल्या 24 तासांत कोकण गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोवाव विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊसाची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे

कोकण आणि गोवा : रामेश्वरी कृषी 12, मालवण 11, देवगड 10, हर्णे, मार्मागोवा 9 प्रत्येकी, मुरुड, पणजी (गोवा) 7 प्रत्येकी, दाभोलिम (गोवा), दापोली, उरण 6 प्रत्येकी, गुहागर, खेड, म्हापसा, माथेरान, शहापूर, श्रीवर्धन, वैभववाडी 5 प्रत्येकी, भिवंडी, कानकोना, पेण, पोलादपूर, वेंगुर्ला 4 प्रत्येकी, भिरा, दोडामार्ग, महाड, मुंबई (सांताक्रूझ), पेडेणे, रत्नागिरी, ठाणे, वसई 3 प्रत्येकी, अंबरनाथ, बेलापूर (ठाणे), कणकवली, कर्जत, कुडाळ, मंडणगड, मडगाव, म्हसळा, मुळदे, रोहा, संगमेश्वर देवरूख, सांगे, सावंतवाडी, सुधागड पाली, तलासरी, उल्हासनगर, वलपोई, वाडा 2 प्रत्येकी, चिपळूण, जव्हार, कल्याण, लांजा, माणगाव, मोखेडा, मुरबाड, राजापूर 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : दहीगाव 8, जामनेर, पाचोरा 6 प्रत्येकी, भडगाव, महाबळेश्वर 5 प्रत्येकी, गगनबावडा, नांदगाव 4 प्रत्येकी, बोडावद 3, आंबेगाव घोडेगाव, चाळीसगाव, इगतपुरी, लोणावाला (कृषी), राधानगरी 2 प्रत्येकी, आजारा, भोर, गारगोटी, ओझरखेडा, पन्हाळा, साक्री, वेल्हे 1 प्रत्येकी.

मराठवाडा : बदनापूर 8, सोयेगाव 6, औरंगाबाद 5, कैज, सिल्लोड 4 प्रत्येकी, फुलंब्री 3, भोकरदन 2, आष्टी, बीड, खुलताबाद 1 प्रत्येकी.

विदर्भ : नेर 6, लाखनी, साकोली, साओली 5 प्रत्येकी, कुही, नागभिड 3 प्रत्येकी, ब्रम्हपुरी, चांदूर बाजार, कारंजा लाड, पौनी, सडक अर्जुनी, यवतमाळ 2 प्रत्येकी, आर्णी, आष्टी, बाभुळगाव, चामोर्शी, चिमूर, दारव्हा, देवरी, दिग्रस, एटापल्ली, गडचिरोली, गोंदिया, हिंगणा, कामठी, खारंगा, कुरखेडा, लखनदूर, मलकापूर, मानोरा, मुल, मूर्तिजापूर, सेलू, तेलहरा, तिरोरा 1 प्रत्येकी.

घाटमाथा : ताम्हिणी 9, अम्बोणे 7, दावडी 5, इुंगरवाडी 4, भिरा 3, शिरगाव, लोणावळा (ऑफिस), लोणावळा (टाटा), भिवपुरी, कोयना (नवजा), खोपोली 2 प्रत्येकी, कोयना (पोफळी), वळवण, खांडी, धारावी 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज

14 जुलै : कोंकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

15 जुलै : गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

16 जुलै : कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

17-18 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

इशारा

14 जुलै : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

15 जुलै : कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्रत तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍्यता

16 जुलै : कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍्यता.

17-18 जुलै : कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

पुण्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता तर मुंबईत आकाश सामान्यत: ढगाळ राहून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like