Weather Report : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची  शक्‍यता

Weather Report: Chance of torrential rain in sparse places in Central Maharashtra, Marathwada and Vidarbha पुण्यात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस तर मुंबईत आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

 एमपीसी न्यूज – दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत असलेला कमी दाबाचा पट्टा आता विरून गेला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

गेल्या 24 तासांत कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी; मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला.
गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:
कोकण आणि गोवा : कुडाळ, मालवण, संगमेश्वर, देवरूख 8 प्रत्येकी, सावंतवाडी 7, वैभववाडी 6, भिरा, चिपळूण, दोडामार्ग, पोलादपूर, राजापूर 5 प्रत्येकी, कणकवली, लांजा, महाड, म्हापसा, मुळदे, पेडणे, वेंगुर्ला 3 प्रत्येकी, दापोली, खेड, मंडणगड, माणगाव, म्हसळा, रत्नागिरी 2 प्रत्येकी, देवगड, हर्णे, जव्हार, कल्याण, खालापूर, माथेरान, मुरबाड, रामेश्वर कृषी, रोहा, शहापूर, श्रीवर्धन, सुधागड पाली, ठाणे, उल्हासनगर 1 प्रत्येकी.
मध्य महाराष्ट्र : सांगोला 6, बार्शी, धरणगाव, पंढरपूर 4 प्रत्येकी, गगनबावडा, हर्सूल, जत, कर्जत, ओझरखेडा, शाहूवाडी, तासगाव 3 प्रत्येकी, आटपाडी, इगतपुरी, लोणावळा (कृषी), पारोळा, विटा 2 प्रत्येकी, अक्कलकोट, एरंडोल, महाबळेश्वर, मिरज, पन्हाळा, शेवगाव, सुरगाणा 1 प्रत्येकी.
मराठवाडा : निलंगा 5, सेलू 4, औसा, देगलूर, जळकोट, उमरगा 3 प्रत्येकी, अंबेजोगाई, बिलोली, जिंतूर, कैज, रेणापूर 2 प्रत्येकी, अर्धापूर, हदगाव, हिंगोली, कळमनुरी, लोहा, माजलगाव, मुदखेड, फुलंब्री, शिरुर कासार, तुळजापूर 1 प्रत्येकी.
विदर्भ : साओली 8, मुलचेरा, वरोरा 4 प्रत्येकी, चामोर्शी, गडचिरोली, गोंदिया, मुल, नागपूर 3 प्रत्येकी, बल्लारपूर, धानोरा, एटापल्ली, गोंड पिपरी, हिंगणा, कामठी, कोरपना, कुही, मारेगाव, पारशिवनी, रामटेक, शिंदेवाहि 2 प्रत्येकी, अर्जुनी मोरगाव, आर्मोरी, आर्वी, भद्रावती, भामरागड, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, देवळी, हिंगणघाट, जिवती, कळमेश्वर, काटोल, लाखंदूर, नागभिड, राजुरा, सावनेर, वणी, झरी झमानी 1 प्रत्येकी.
घाटमाथा : कोयना (पोफळी), शिरगाव, कोयना (नवजा) 6 प्रत्येकी, भिरा 5, इंगरवाडी 4, ताम्हिणी , लोणावळा (टाटा), दावडी, खोपोली 2 प्रत्येकी, अम्बोणे, लोणावळा (ऑफिस), वळवण 1 प्रत्येकी.
पुढील हवामानाचा अंदाज :
20 जुलै : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.
21 – 22 जुलै : कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शकक्‍्यता.
23 – 24 जुलै : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.
इशारा :
20 जुलै : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जजा व विजांचा   कडकडाट होण्याची शक्‍्यता.
21 जुलै : विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचाकडकडाट होण्याची शक्यता.
22 जुलै : मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
23 जुलै : गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
24 जुलै : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची
शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
पुण्यात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता तर मुंबईत आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.