Weather Report :मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता

एमपीसी न्यूज – मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात येत्या 24 तासांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. 

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा : केप 8, कानाकोना, सांगे 6 प्रत्येकी, श्रीवर्धन 5, म्हापसा, माडगव, मोखेडा 3 प्रत्येकी, अलिबाग, माणगाव, पेडणे, शहापूर, वेंगुर्ला, विक्रमगड 2 प्रत्येकी, दाभोलिम (गोवा), देवगड, गुहागर, कल्याण, लांजा, मुंबई (सांताक्रूझ), पालघर, वसई 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : धुळे 9, चांदवड, देवळा, कळवण 8 प्रत्येकी, अकोले, सिन्नर 7 प्रत्येकी, खेड राजगुरूनगर, कोपरगाव, मात्रेगाव, नांदगाव, निफाड, राहुरी, साक्री, सिंद खेडा 5 प्रत्येकी, आंबेगाव घोडेगाव, बारामती, भुसावळ, दहीगाव, दिंडोरी, नेवासा , सतना बागलाण, शिरूर घोडनदी, येवला ४ प्रत्येकी, अमळनेर, धारणगाव, गिरना धरण, मुल्दे, ओझर (नाशिक), पुणे (लोहगाव), राहाता, श्रीरामपूर, सुरगाणा 3 प्रत्येकी, भडगाव, गडहिंग्लज, इगतपुरी, इंदापूर, संगमनेर, शेवगाव, शिरोळ, यावल 2 प्रत्येकी, बोदवद, चाळीसगाव, हातकणंगले, जळगाव, जामनेर, जाट, जुन्नर, करमाळा, कवठे महाकाळ, खंडाळा बावडा, खटाव वडूज, कोरेगाव, ओझरखेडा, पाचोरा, पन्हाळा, पुरंदर सासवड, रावेर सांगली , तासगाव, वेल्हे 1 प्रत्येकी.

मराठवाडा : पाथरी 10, सोनपेठ 9, परतूर 8, जालना, मानवत 7 प्रत्येकी, माजलगाव, मंठा 6 प्रत्येकी, औंधा नागनाथ, भोकरदन, कैज, पाटोदा, सोयगाव 5 प्रत्येकी, औरंगाबाद, गेवराई, घनसावंगी, हिमायतनगर, जळकोट, किनवट, पैठण 4 प्रत्येकी, अहमदपूर, बिलोली, धर्मबाद, धारूर, गंगापूर, जाफराबाद, जिंतूर, लोहारा, पालम, परभणी, परळी वैजनाथ, सिल्लोड, उमारी, वैजापूर 3 प्रत्येकी , कळंब, खुलताबाद, लोहा, मुखेड, पूर्णा, सेलू, वडावणी 2 प्रत्येकी, अंबड, आष्टी, बदनापूर , बीड, डग्लूर, गंगाखेड, कंधार, कन्नड, नांदेड, फुलंब्री, सेनगाव, शिरूर कासार, तुळजापूर, वसमत 1 प्रत्येकी.

विदर्भ : देऊळगाव राजा , कळमेश्वर, कुही 3 प्रत्येकी, अंजनगाव, आर्वी, बटकुली, बुलढाणा, चांदूर, चिखली, दर्यापूर, लाखंदुर, मात्रेगाव, सावनेर, सिरोंचा, तेलहरा, वणी, वरुड २ प्रत्येकी, अकोट, आष्टी, बाभुळगाव, भामरागड, चंद्रपूर, देवळी , धामणगाव, हिंगणा, जिवती, काटोल, खामगाव, कुरखेडा, महागाव, मंगळुरापीर, मौडा, मेहकर, मुल, नांदगाव काजी, नंदुरा, नेर, पर्सेओनी, रामटेक, सेलू, शिंदेवाहि, सिंधखेड राजा, तिवसा, वर्धा 1 प्रत्येकी.

घाटमाथा: शिरगाव, ठाकूरवाडी, दावडी, डोंगरवाडी, कोयना (पोपळी), खोपोली, ताम्हिणी 1 प्रत्येकी

पुढील हवामानाचा अंदाज:

21 सप्टेंबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

22 सप्टेंबर : कोकण-गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

23 सप्टेंबर : कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

24 सप्टेंबर : कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा:

21 सप्टेंबर: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता.

22 सप्टेंबर: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

23 सप्टेंबर: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.