Weather Report: कोकण गोव्यात व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Weather Report: Chance of torrential rain in sparse places in Konkan, Goa, and Vidarbha पुण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा कायम असून गेल्या 24 तासांत कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला तर, कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊसाची नोंद करण्यात आली.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा : बेलापूर (ठाणे) 21, ठाणे 16, कल्याण 13, मुंबई (सांताक्रूझ), पालघर, उल्हासनगर 12 प्रत्येकी, अंबरनाथ, वाडा 12 प्रत्येकी, भिवंडी 10, जाभार, माथेरान, तलासरी, विक्रमगड 9 प्रत्येकी, मोखेडा 8, खालापूर, पनवेल, शहापूर, उरण 7 प्रत्येकी, भिरा, डहाणू, कर्जत, मुरबाड, पेण, सुधागड पाली 5 प्रत्येकी, खेड, महाड, मंडणगड, वाल्पोई, वसई 4 प्रत्येकी, कणकवली, लांजा, माणगाव, पोलादपूर, सावंतवाडी, श्रीवर्धन 3 प्रत्येकी, म्हसळा, केप, रोहा, साळंगे, वैभववाडी 2 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : वेल्हे 8, राधानगरी 7, आजारा, इगतपुरी 6 प्रत्येकी, महाबळेश्वर, पन्हाळा, शिरपूर 5 प्रत्येकी, हर्सूल, ञ्यंबकेश्वर 4 प्रत्येकी, अमळनेर, गगनबावडा, जामनेर, जावली मेधा, ओझरखेडा, शाहवाडी 3 प्रत्येकी, अक्कलकुवा, पौड मुळशी, पेठ, सुरगाणा 2 प्रत्येकी.
मराठवाडा : हिमायतनगर, कळमनुरी, खुलताबाद, किनवट, सेलू 3 प्रत्येकी, जालना, उदगीर 2 प्रत्येकी, औंधा नागनाथ, बिलोली, धर्माबाद, हदगाव, हिंगोली, जाफराबाद, माहूर, परळी वैजनाथ, पाथरी, पाटोदा, फुलंब्री, सिल्लोड 1 प्रत्येकी.

विदर्भ : भंडारा 10, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा 8 प्रत्येकी, आरमोरी, चंद्रपूर, चिमूर, पोंभुर्णा, साकोली, साओली 7 प्रत्येकी, बल्लारपूर, गडचिरोली, शिंदेवाही 6 प्रत्येकी, अहीरी, बाभुळगाव, चामोर्शी, घाटंजी, जिवती, मुल, मूलचेरा, रामटेक, सिरोंचा, वरोरा 5 प्रत्येकी, भद्रावती, भामरागड, दारव्हा, गोंड पिपरी, कळंब, लाखंदूर, लाखनी, पारशिवनी 7 प्रत्येकी, अर्जुनी मोरगाव, आर्णी, ब्रम्हपुरी, बुलढाणा, चांदूर बाजार, एटापल्ली, गोंदिया, कोरची, मलकापूर, मौदा, नागभीड, नंदुरा, पांढरेकेवडा, राजुरा, तिरोरा, तुमसर, यवतमाळ 3 प्रत्येकी, अकोला, भिवापूर, चिखलदरा, देवळी, दिग्रस, गोरेगाव, हिंगणघाट, जळगाव जामोद, मोहाडी, नेर, परतवाडा, राळेगाव, सडक अर्जुनी, संग्रामपूर, शेगांव, वणी, झरी झमनी 2 प्रत्येकी.

घाटमाथा : कोयना (नवजा) 12, ताम्हिणी, शिरगाव 9 प्रत्येकी, दावडी 7, अम्बोणे, लोणावळा (ऑफिस) 6 प्रत्येकी, खंद, डुंगरवाडी, खोपोली, वळवण 5 प्रत्येकी, ठाकूरवाडी, शिरोटा 4 प्रत्येकी, कोयना (पोफळी) 3, वाणगाव 2, भिवपुरी, लोणावळा (टाटा) 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज

7 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शकक्‍्यता.

8 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

9  – 10 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

इशारा 

7 जुलै : कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍्यता.

8 – 10 जुलै : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.’

पुण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.